आजच्या काळात पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायू. जसे कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड किंवा मिथेन यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान एक अंशापेक्षा जास्त वाढले आहे. या घटनेला आपण सामान्य भाषेत जागतिक उष्णता किंवा पृथ्वीउष्णता म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीला हवामान बदलाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाचा आगामी पिढीच्या भवितव्यावर काय परिणाम होईल, हे साऱ्या जगासमोर आता उघड झाले आहे. संपूर्ण वैज्ञानिक समुदायासाठी ही चिंतेची बाब आहे.
हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. शेतीत बरेच दुष्परिणाम नोंदवले गेले आहेत. या सर्व हरितगृह वायूतील बराचसा भाग कृषी क्षेत्रातूनही येतो. अशा परिस्थितीत जैन हिल्स येथील हा हायटेक शेतीचा नवा हुंकार कार्यक्रम आशा जागवणारा आहे. यात दाखवले जाणारे तंत्रज्ञान हे प्रामुख्याने कृषी क्षेत्राला पूरक तंत्रज्ञान आहे, जसे की, क्लायमेट स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजी.
क्लायमेट स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय ?
क्लायमेट स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. कारण हे सगळे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातील हरितगृह वायूशी संबंधित आहे, जसे की कार्बन उत्सर्जन, नायट्रस ऑक्साईड उत्सर्जन किंवा मिथेन उत्सर्जन, तर या क्लायमेट स्मार्ट फार्मिंग सोल्युशन्स किंवा क्लायमेट स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजीद्वारे आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याला आम्ही कार्बन फार्मिंग इनिशिएटिव्ह असे नाव दिले आहे.
कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यानं अतिरिक्त उत्पन्न आता हा कार्बन शेती उपक्रम काय आहे? कार्बन शेती, उपक्रम किंवा कार्बन शेती जी हाती घेतली जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना संधी मिळते, ज्यामध्ये ते आपल्या शेतातून आपले पीक घेऊ शकतात. आता पीक वाढू शकते आणि कमी खर्चात अधिक पीक घेता येते. त्याचबरोबर कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून ते अतिरिक्त उत्पन्न घेऊ शकतात.
कार्बन क्रेडिट म्हणजे काय?
क्लायमेट स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे शेतकऱ्याच्या शेतातील वीज किंवा खताची बचत झाल्याचे सिद्ध झाले तर किंवा चांगल्या शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मातीतील सेंद्रिय कार्बन वाढला तर ते आहे कार्बन क्रेडिट. चांगल्या शेती पद्धती करून शेतातील मातीतील सेंद्रिय कार्बन वाढला असेल तर या सर्व प्रयत्नांचे रूपांतर कार्बन क्रेडिटमध्ये होऊ शकते. एक कार्बन क्रेडिट म्हणजे 1 टन कार्बन डायऑक्साईड किंवा 1,000 किलो कार्बन डायऑक्साईड कमी करणे.
शेतकऱ्यांना कसे मिळते कार्बन क्रेडिट ?
हे आपण सोप्या प्रकारे समजून घेऊ. समजा एखादा शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळला आहे आणि ते पहिले 100 युनिट वापर करत असत. आता त्याने 70 युनिट्स वापरले आहेत, त्यामुळे हे उरलेले 30 युनिटस त्याचे कार्बन क्रेडिट आहेत. या 30 युनिट कमी वापरामुळे त्याने किती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केले, त्याच्या शेतातून त्याच्या प्रयत्नाचे रूपांतर कार्बन क्रेडिटमध्ये होऊ शकते. ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. काही कार्बन क्रेडिटची मागणी अशी आहे की, युरोपसारख्या विकसित राष्ट्रांनी किंवा अमेरिकेसारख्या देशांनी कार्बन डायऑक्साईड काही टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जैन समूह करणार पूर्ण मदत जर बंधनकारक लक्ष्य वाचलेल्या क्रेडिटपेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी कार्बन क्रेडिटची मागणी असते. त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्बन क्रेडिटचे योग्य दस्तऐवज असणे आवश्यक आहे. थर्ड पार्टी डॉक्युमेंटेशन केल्यानंतर, ऑडिट करत असेल तर हे डॉक्युमेंटेशन आणि हे ऑडिट वैयक्तिक शेतकऱ्याच्या पातळीवर किंवा काही शेतकऱ्यांच्या पातळीवर करता येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा गट आणि तज्ज्ञांची टीम आवश्यक आहे. जैन समूहाच्या कार्बन शेती उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही हे सहज करू शकता! तुम्हाला त्यात रस असेल आणि तुम्ही आमच्यात सामील झालात तर त्याचे डॉक्युमेंटेशन किंवा ऑडिट केले जाईल, अशी संधी शेतकऱ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी जैन इरिगेशन तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे.
शेतकऱ्यांना कुठल्या नोंदी ठेवाव्या लागतात?
डॉक्युमेंटेशन करताना किंवा ऑडिट पूर्ण करताना आणि त्या बदल्यात तुम्ही मागत असलेल्या डेटाची किंवा तुमच्या शेतात कोणते क्लायमेट स्मार्ट फार्मिंग टेक्नॉलॉजी वापरत आहात, त्यात किती खत वापरत आहात, याची नोंद ठेवावी लागेल. विजैची किती बचत होत आहे? या सर्व नोंदी ठेवाव्या लागतील. त्यामुळे या प्रक्रियेद्वारे कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून कार्बन क्रेडिट मिळणे शक्य आहे. शेतकरी या मागनि सहभागी होऊन त्याचा लाभ घेऊ शकतील. यात शेतकऱ्यांना जोडण्यासाठी आम्ही पहिल्या टप्यात त्यांची जनजागृती करत आहोत. शेतकरी पूर्ण विश्वासाने आमच्या सोबत जुळू शकतात. त्यांच्या माहितीसाठी, कृषी महोत्सवात कार्बन क्रेडिट प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणारी काही माहितीपत्रके ठेवली गेली आहेत. अर्थात, शेतकरी नंतरही ही माहिती घेऊ शकतात.
लवकरच शेतकऱ्यांची बैठक, कागदपत्रांना मदत करणार
आम्ही कार्बन फार्मिंग इनिशिएटिव्ह मराठीत स्थानिक भाषेत तयार केला आहे. त्याचप्रमाणे आम्ही काही व्हिडिओ तयार केले आहेत, ज्यातून शेतकन्यांना माहिती मिळत आहे. त्यातून ते त्यांच्या शेतातून अतिरिक्त उत्पन्न म्हणून कार्बन क्रेडिट तयार करू शकतात. पुढील टप्यात इच्छुक शेतकऱ्यांसाठी विशेष बैठक बोलवू आणि त्यानंतर शेतकरी तयार झाल्यास पुढील कागदपत्रांसाठी मदत करू.
अतीनकुमार त्यागी वरिष्ठ व्यवस्थापक, जैन इरिगेशन सिस्टीम्स, जळगाव.