हॅपनिंग

अहिंसेचे उपासक रतनलालजी बाफना यांचे निधन

जळगांव/प्रतिनिधी

अहिंसेचे उपासक व शाकाहाराचे प्रणेते रतनलालजी बाफना यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन . आज दि 16 नोव्हे रोजी  जळगांव येेेथे त्यांचे निधन झाले. राज्यांतच नव्हे तर देशभर आपल्या दातृत्वांसाठी प्रसिध्द असलेल्या रतनलालजी बाफना याांनी सोन्याच्या व्यावसायाच्या माध्यमातून   राज्यभर  आपली ओळख निर्माण केली होती.

गोप्रेमी बाफनाजी

शाकाहाराचे कट्टर प्रणेते असलेल्या बाफनाजी यांनी जिह्यातील कुसुंबा येथे प्रसिद्ध अशी गोशाळा “अहिंसा तीर्थ” या नावाने सुरू केलेली असून त्याच ठिकाणी आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले  जाणार  आहे.

समाजकार्यात  सतत अग्रेसर असणाऱ्या बाफनाजींच्या पश्चयात पत्नी नयनतारा मुलगा सिद्धार्थ , सून , नातवंडे, पुतणे आणि भाऊ कस्तुरचंद असा परिवार आहे.

त्यांच्या जाण्याने आर.सी. बाफना परिवारावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, दलुभाऊ जैन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Back to top button