अमेरिकन लष्करी अळी आपली उपजीविका पानांवर करते. सुरुवातीच्या अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी काहीवेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीकवाढीचा भाग खातात, ज्यामुळे तुरा बाहेर येत नाही. कोवळी कणसे खातात.
एकात्मिक नियंत्रण
भौतिक नियंत्रण शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. एकरी 15 कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही. पिकाच्या सुरवातीच्या 30 दिवसांपर्यंत पोंग्यात वाळू व चुना 9:1 या प्रमाणात टाकावे. एकरी 10 पक्षीथांबे लावावेत.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
प्रतिबंधात्मक उपाय
पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
जैविक नियंत्रण
अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी 50,000 अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत. नोमुरीया रिलेयी 3 ग्रॅम किंवा मेटारायझिअम ॲनिसोप्ली 5 ग्रॅम यापैकी एका बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण (फवारणी)
अळीच्या वाढीच्या लवकरच्या (एक ते तीन) अवस्था – ॲझाडिरेक्टीन (1,500 पीपीएम) 5 मि.लि. थायमेथोक्झाम (12.6%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (9.5% झेडसी) 0.5 मि.लि. किंवा स्पिनोटोराम (11.7 एससी) 0.9 मि.लि. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (18.5 एससी) 0.4 मि.लि.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇