पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर हा प्रतिक्विंटल चार हजार रुपये मिळाला असून दोन क्विंटल इतकी आवक झाली.
काल (दि. 26) रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल 5 हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात दर घसरल्याने बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 1 हजार रुपयांनी घसरला होता. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळाला. तर लासलगाव- निफाड कृषी बाजार समितीत कांद्याला 4 हजार 551 रुपये दर मिळाला.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा (28/11/2023) |
|||
पुणे -पिंपरी | क्विंटल | 2 | 4000 |
कांदा (27/11/2023) | |||
जुन्नर – नारायणगाव | क्विंटल | 86 | 2500 |
सोलापूर | क्विंटल | 42926 | 2800 |
बारामती | क्विंटल | 329 | 2500 |
लासलगाव | क्विंटल | 3900 | 4101 |
लासलगाव – निफाड | क्विंटल | 150 | 4299 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 6200 | 4600 |
राहूरी -वांबोरी | क्विंटल | 977 | 3200 |
संगमनेर | क्विंटल | 4370 | 3306 |
पुणे | क्विंटल | 7291 | 3000 |
पुणे -पिंपरी | क्विंटल | 5 | 3000 |
पुणे-मांजरी | क्विंटल | 77 | 3500 |
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीकडे मंत्र्यांनीच वेधले मुख्यमंत्र्यांसह कृषी व सहकार मंत्र्यांचे लक्ष
- अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश