• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उन्हाळ्यात शेळ्यांची घ्यावयाची काळजी..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2022
in हॅपनिंग
0
उन्हाळ्यात शेळ्यांची घ्यावयाची काळजी..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते व हे नियोजन जर आपण व्यवस्थितरीत्या आत्मसात केले तर आपल्याला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. अशा वातावरणामुळे शेळ्यांमध्ये प्रामुख्याने फाशीचा रोग पसरतो. या रोगात खूप ताप येतो, जनावर थरथरते, त्यांचा तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्वास घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे.

 

अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… 🥭 

खालील व्हिडिओ पहा..

https://fb.watch/cakdUNv3cy/

उन्हाळ्यातील रोग व काळजी –
वाढते तापमानासह बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

उष्माघात
शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105 -106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.

उन्हाळी हगवण
एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.

 

आम्लीय अपचन
उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा असे अपचन होते.

जंतबाधेमुळे दुष्परिणाम
खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीची अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्लेष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.

 

उपचार व प्रतिबंध
उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणार्‍या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रोलाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे. तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे. जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.

जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्या आहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यनक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे. जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल.


परोपजीवी
शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्भवणार्‍या समस्येवर उपाय ठरते.

 

(सौजन्य – अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रकाशन)
अंकासाठी संपर्क – 9130091621 / 9130091622

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आम्लीय अपचनइलेक्ट्रोलाइटउन्हाळी हगवणउन्हाळ्यातील रोगउपचारउष्माघातकाळजीजंतबाधापचनशक्तीपरोपजीवीप्रतिबंधलसीकरणशेळीशेळी-मेंढी
Previous Post

उन्हाळ्यात अशी घ्या कोंबड्यांची काळजी..

Next Post

महिलांसह ग्रामीण युवकांना नवी दिशा… शास्त्रज्ञ अमृता राऊत देताहेत अन्न प्रक्रिया उद्योगाचे धडे

Next Post
महिलांसह ग्रामीण युवकांना नवी दिशा… शास्त्रज्ञ अमृता राऊत देताहेत अन्न प्रक्रिया उद्योगाचे धडे

महिलांसह ग्रामीण युवकांना नवी दिशा... शास्त्रज्ञ अमृता राऊत देताहेत अन्न प्रक्रिया उद्योगाचे धडे

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish