• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दुर्गम भागात टलूराम पटले यांची आधुनिक शेती

Team Agroworld by Team Agroworld
September 30, 2019
in यशोगाथा
0
दुर्गम भागात टलूराम पटले यांची आधुनिक शेती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतीला दुग्धव्यवसायाची जोड


दुर्गम म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. सिंचनाचा अभाव असलेल्या या जिल्ह्यात एकाच पीक पद्धतीवर अवलंबीता असल्याने अपेक्षित आर्थिक बदल घडला नाही. परंतू पांजरा येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, शेतीला यांत्रिकीरणाची जोड आणि इतर पूरक आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीक्षत्रात नवा विश्वास या भागातील शेतकर्‍यांमध्ये निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.



पटले कुटूंबीयांची वडिलोपार्जीत 12 एकर शेती. दूग्ध व्यवसायाच्या बळावर त्यात नव्याने 10 एकर शेतीची भर टलूराम यांनी घातली. आज एकूण जमीनधारणा 22 एकर आहे. या संपूर्ण शिवारात इतर शेतकर्‍यांप्रमाणे खरिपात धान (भात) लागवड केली जाते. रबी हंगामात हरभरा, लाखोळी गहू आणि ऊस अशी व्यवसायीक पीके घेण्यावर त्यांचा भर राहतो. करारावर आठ एकर शेती ते करतात. त्यासाठी चार हजार रुपये प्रती एकर असा दर देतात. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी करारावरील शेतीत देखील सातत्य राखले आहे. धानाची एकरी उत्पादकता सरासरी 15 क्विंटल, लाखोळीची पाच ते दहा क्विंटल अशी उत्पादकता होते. व्यवस्थापन, वातावरण अशा अनेक बाबी लाखोळी उत्पादनावर परिणाम करणारे घटक ठरतात. पाण्याचा अभाव आणि कारखान्याचे असहकार्याचे धोरण यामुळे ऊस लागवड गेली तीन वर्ष केली नव्हती. यावर्षी दीड एकरावर पुन्हा ऊस लावला आहे. हरभरा देखील दीड एकरावर आहे. गहू आठ एकरावर लावला आहे.

विशेष सयंत्र बनवले
गावालगत नाला आणि तलाव आहे. या दोन्ही स्त्रोतामधील पाण्याचा वापर गरजेच्यावेळी केला जातो. दोन्ही पाण्याचे स्त्रोत शेतीपासून हजार फूट अंतरावर आहेत. ट्रॅक्टरचलित पंपाचा याकामी वापर होतो. ट्रॅक्टरच्या पीटीओ सॉफ्टद्वारे पाणी खेचले जाते. या सयंत्रासाठी 50 हजार रुपयांचा खर्च आला. एकाचवेळी दोन पंप चालतात अशी या सयंत्राची रचना आहे. टलूराम यांचा मुलगा देवानंद याने आपल्या कल्पकतेतून हे सयंत्र तयार केले आहे. जनावरांनापासून पिकाचे संरक्षण व्हावे, म्हणून त्यांना हाकलण्यासाठी विशेष यंत्र केले आहे. प्लॅस्टीक पाईप व लायटरचा उपयोग करीत विशेष सयंत्र केले असून त्यातून मोठा आवाज निघतो. कारपेट टाकून त्यावर पाणी टाकल्यास नंतर लायटरचा वापर करुन त्यातून विशिष्ट आवाज निघतो त्याला प्राणी घाबरतात, असे त्यांनी सांगीतले.

दुग्ध व्यवसायाची सुरवात
वर्ष 2003 मध्ये त्यांनी अवघ्या साडेतीन हजार रुपयात एक म्हैस घेतली. परंतू अवघ्या काही वर्षातच ती मरण पावली. तिच्या मरणाचे कारण जाणून घेतले असता शवविच्छेदनात तिच्या पोटातून काही नाणी व इतर साहित्य निघाले. पहिली म्हैस सहज घेतली असली तरी तिच्यापासून दुग्ध व्यवसाय आणि दूधाळ जनावरांचा लळा लागला. परिणामी या व्यवसायात मागे वळून न पाहता पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तिच्यापासून 11 वेत झाले. त्यानंतर आणखी एका म्हशीची खरेदी केली. आज त्यांच्याकडील जनावरांची संख्या लहान मोठे धरून 51 वर पोचली आहे. त्यामध्ये गावरान, मुर्‍हा, जाफराबादी जातीच्या म्हशींचा समावेश आहे.

दर्जेदार म्हैस खरेदीवर भर
दूध देत नाही किंवा दूध काढताना त्रास देणार्‍या म्हशी, गायी विकण्यावर अनेक शेतकर्‍यांचा भर राहतो. अशा म्हशी शोधून त्या खरेदी करण्यावर माझा भर राहतो, असे टलूराम सांगतात. भाकड म्हशी घेऊन त्या फळविण्यावर देखील त्यांनी लक्ष्य दिले. अशी जनावरे बाजारात स्वस्त दरात मिळतात. सरासरी 70 हजार ते 1 लाख रुपयांना बाजारात चांगल्या प्रतीची जनावरे मिळतात. परंतू भाकड आणि काही दोष असलेली जनावरे त्या तुलनेत स्वस्तात मिळतात. 2016 मध्ये 41 म्हशी होत्या आणि आता त्यांच्याकडील जनावरांची संख्या 51 झाली आहे. या व्यवसायासाठी आणि शेतीसाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज ते घेत नाही. शेतीतील उत्पन्न शेती व्यवस्थापनावरच खर्च करीत असल्याने हे शक्य होते, असे ते सांगतात.

दुग्ध उत्पादकता
दुग्ध व्यवसायासाठी पुढाकार घेणार्‍या टलूराम यांच्याकडील रोजचे दूध संकलन 70 लिटरच्या घरात आहे. त्यामध्ये म्हैस आणि गाय या दोन्ही प्रकारच्या जनावरांपासून मिळणार्‍या दुधाचा समावेश आहे. उत्पादित दुधाची विक्री पहेला येथील अतूल डेअरीला होते. डेअरीच्या संचालकांकडून गावातील दुधाची उत्पादकता पाहता थेट गावातूनच कलेक्शन होते. दुधाला फॅटच्या प्रमाणात 18 ते 28 रुपये लिटरचा दर मिळतो. तुलनेत हा दर कमी असला तरी दुग्ध व्यवसाय दर आठवड्याला गरजा भागविण्यासाठी लागणार्‍या पैशाची सोय करण्यास पूरक ठरतो.

प्रक्रियाजन्य उत्पादनावर भर
ज्या दिवशी मागणी नसेल त्या दिवशी शिल्लक दूधापासून उपपदार्थ करण्यावर भर दिला जातो. त्यामध्ये दही, तूप या उपपदार्थांचा समावेश आहे. महिन्याला दहा किलो तूप आणि मागणीनुसार दही बनवले जाते. तूपाची विक्री 600 रुपये किलोप्रमाणे होते. परिसरातील अनेक गावांमध्ये तूपाच्या दर्जाविषयी माहिती असल्याने ग्राहकांकडूनच घरुनच तूपाची उचल होत असल्याचे ते सांगतात. तूप विकण्यासाठी कधीही बाजारात जावे लागले नाही. दह्याच्या बाबतीत देखील असेच आहे. लग्न किंवा इतर कार्यक्रमासाठी मागणी नोंदविले जाते. त्यानंतरच दह्याचा पुरवठा होतो.

चार्‍याची केली सोय
दूधाळ जनावरांसाठी चार्‍याची गरज भासते हे लक्षात घेत त्यांनी दोन एकर क्षेत्र याकरीता राखीवच ठेवले आहे. या क्षेत्रात मका, ज्वारी, बर्सीन गवत, बाजर्‍याची लागवड केली जाते. धान काढणीनंतर मिळणारे तणस देखील चारा म्हणून वर्षभर उपयोगात आणले जाते.

शेणापासून बायोगॅस निर्मिती
घरी दूधाळ जनावरांची मोठी संख्या आणि त्यापासून मिळणारे शेणही त्यामुळे मुबलक. या शेणाचा उपयोग व्हावा याकरीता टुलराम पटले यांनी शेणावर प्रक्रिया करीत ते कुजवित त्याचे कम्पोस्ट तयार करण्यावर भर दिला आहे. त्यांचे वडील बळीराम पटले यांनी घरी जनावरांची संख्या जेमतेम असताना 11 फेब्रुवारी 1986 साली बायोगॅसची बांधण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे त्यावेळी बायोगॅस उभारणीसाठी पैशाची सोय नसल्याने 2439 रुपयांचे कर्ज बँकेकडून त्यांनी घेतले. त्यासाठी 1100 रुपयांचे अनुदानही त्यांना मिळाले. त्यामुळे प्रयोगशीलता आधीपासूनच या कुटूंबाने जपली होती. 1986 साली बांधलेला हा गोबरगॅस आजही सुरू आहे. त्यांच्या कुटूंबात 8 व्यक्ती आणि चार नोकरांचा समावेश आहे. या सर्वांचा स्वयंपाक गोबरगॅसवरच होतो. त्यामुळे गेल्या 33 वर्षांत सिलींडरकरीता नोंदणीच केली नाही. पर्यायाने लाखो रुपयांची बचत झाली आहे. त्यांच्याकडील गोबरगॅसची दखल घेत त्याचवेळी गावात 26 गोबरगॅसची उभारणी झाली. परंतू आज त्यातील 2 गोबरगॅसच सुरू आहेत.

कम्पोस्ट उत्पादन, वापर
जनावरांपासून रोज सरासरी 200 किलो शेण मिळते. बायोगॅसमधील वापर वगळता उर्वरित शेण घराजवळच साठविले जाते. त्यासाठी खास जागा राखीव आहे. त्याच ठिकाणी शेतातील काडीकचराही जमा केला जातो. हे कुजल्यानंतर उत्तम प्रतीचे शेणखत तयार होते. या खताचा वापर दरवर्षी शेतात होतो. त्यामुळे रासायनिक खतावरील खर्चही वाचला आहे. सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचा उद्देश यामुळे बहूतांशी साध्य होतो, असे ते सांगतात.

गोमूत्राचा पिकासाठी वापर
त्यांच्याकडील जनावरांपासून रोज 100 लिटर गोमूत्र मिळते. गावातील काही शेतकर्‍यांची मागणी असल्यास त्यांना गोमूत्र निशुल्क दिले जाते. त्यासोबतच गरजेच्यावेळी घरच्या शेतात त्याचा वापर केला जातो. सकाळ तसेच संध्याकाळ असे दोन्ही वेळचे गोमूत्र संकलनासाठी दोन वेगवेगळे टँक तयार करण्यात आले आहेत. सकाळी जनावरे चरण्यासाठी गेल्यानंतर आणि परतल्यानंतर दोन्ही वेळचे गोमूत्र या माध्यमातून संकलन होते.

शेतीचे यांत्रिकीकरण
शेतीत प्रयोगशीलता जपणार्‍या टलूराम यांनी यांत्रिकीरणावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून भर दिला आहे. 1992 मध्ये त्यांनी पहिला ट्रॅक्टर घेतला. 72 हजार रुपयात खरेदीचा करार झाला. इसारापोटी 100 रुपये त्या मालकाला दिले. ट्रॅक्टर मालकावर 60 हजार रुपयांचे कर्ज होते. तीन वर्ष वापरल्यानंतर संबंधिताने खरेदीचा व्यवहार पूर्ण केला नाही. परिणामी तो निशुल्कच वापरतात आला. त्यानंतर आता तीन ट्रॅक्टरची खरेदी त्यांनी केली आहे. जमीन सपाटीकरण तसेच मशागतीसाठी ते भाडेत्वावर दिली जातात. अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय या माध्यमातून त्यांनी शोधला आहे. रोटाव्हेटरकरीता तासाला एक हजार रुपये आकारले जातात. चिखलणीसाठी एक हजार रुपये तर जमीन सपाटीकरणासाठी 600 रुपये तास असा दर आहे. त्याकामी लागणार्‍या सयंत्राची खरेदी त्यांनी केली आहे.


दुग्धोत्पादकांचे गाव
बाराशे लोकवस्तीच्या पांजरा गावात 123 म्हशी आणि 280 गावरान, 47 जर्सी गायी, 340 शेळ्या आहेत. पशुसंवर्धन विभागातर्फे गावातील जनावरांची संख्या पाहता गावात नियमित सर्वेक्षण करून लसीकरण केले जाते. त्यामुळे गावातील जनावरांचे आरोग्य चांगले राखता आले आहे. विशेष म्हणजे या गावात दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी टलूराम यांनीच पुढाकार घेतला. गावातील अनेकांना स्वस्तात म्हशी खरेदी करून देण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या पुढाकारानेच गावात धवलक्रांतीची बीजे रुजण्यास मदत झाली आहे.
संपर्क टलूराम बळीराम पटले
मो.नं. 9325554706

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गोमूत्राचा पिकासाठी वापरदुग्धोत्पादकशेणापासून बायोगॅस
Next Post

पाणी नियोजनातून यशस्वी शेती, दाळमिलचीही जोड

Next Post
पाणी नियोजनातून यशस्वी शेती, दाळमिलचीही जोड

पाणी नियोजनातून यशस्वी शेती, दाळमिलचीही जोड

ताज्या बातम्या

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish