हवामान अंदाज

IMD कडून या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

मुंबई : राज्यातील काही भागात आज पावसाचा जोर कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD ) काल अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. याप्रमाणे अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने हजेरीही लावली होती. पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला असला तरी काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. याठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

नाशिकसह पुणे, पालघर, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
जळगाव, धुळे, नंदुरबार, छ. संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button