सणासुदीच्या काळात शेवंती लागवडीतून दरमहा 1 लाखांचे उत्पन्न

कर्नाटकातील चित्रदुर्ग प्रदेश पूर्वी पावसावर अवलंबून असलेला शेतीप्रधान प्रदेश होता, तिथे यंदा मुबलक पाणी मिळू लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही हंगामात मारिकनीवे धरण भरू लागले आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे कल दाखवायला सुरुवात केली आहे. चित्रदुर्ग शहराजवळील मदकरिपूर येथील शेतकरी हनुमंत रेड्डी हे नेहमीच आपल्या शेतात शेवंतीची फुले लावतात, सणासुदीच्या काळात त्यातून दरमहा एक लाखांचे उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा अनुभव आहे.
आठवड्याला 25 ते 30 हजार कमाई
हनुमंत रेड्डी यांनी आपल्या शेतात शेवंती फुलांची लागवड सुरू केली असून, त्यातून ते आठवड्याला सरासरी 25 ते 30 हजार रुपये कमावत आहेत. मात्र, रेड्डी हे सुरुवातीपासून फुलशेतकरी नव्हते. ते कोबी, मका इत्यादी पिके घेत असत. फुलशेतीमध्ये त्यांनी अलीकडेच पाऊल ठेवले असून, पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यानंतर ते आता पूर्णपणे शेवंती लागवड व इतर पुष्पशेती करू लागले आहेत.
नफा बाजारभावावर अवलंबून
अर्थात फुले पिकवणे फायदेशीर आहे की नाही, ते आसपासच्या बाजारावर अवलंबून असल्याचे हनुमंत रेड्डी सांगतात. यातील नफासुद्धा बाजारातील फुलांच्या भावावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, जेव्हा शेतात लावलेल्या शेवंतीच्या रोपांना फुले येऊ लागतात, तेव्हा बाजारात त्यांचा भाव फक्त 20 ते 30 रुपये प्रति किलो मिळतो. यंदा, संक्रांतीच्या काळात, तो 130 रुपयांवरून 150 रुपये प्रति किलो झाला होता. नंतर तो पुन्हा 40 रुपये प्रति किलो खाली आला. पण, शिवरात्री आणि उगादीच्या काळात तो पुन्हा वाढला. जेव्हा बाजारात फुलांचे भाव वाढतात, तेव्हा जास्त नफा मिळतो.
View this post on Instagram
घरची माणसे असल्यास वाचते मजुरी
हनुमंत रेड्डी यांच्या शेतात आठवड्यातून दोनदा फुले तोडली जातात. एकदा फुले तोडल्यावर त्यांना 2 क्विंटल फुले मिळतात. म्हणजेच, 200 किलो फुले तोडली जातात. सध्या बाजारात फुलांचा भाव 150 रुपये आहे. एकदा फुले तोडल्यावर त्यांना 30,000 रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी मजुरी आणि कमिशन मिळून 8,000 ते 10,000 रुपये खर्च होतात. त्यांच्याकडे 20,000 रुपयांचे उत्पन्न शिल्लक राहते. हा त्यांचा नफा आहे.
पूर्णिका जातीच्या शेवंतीची लागवड
हनुमंत रेड्डी हे तामिळनाडूमधून शेवंतीची फुले आणतात. पूर्णिमा, यलो पेपर, चांदनी, सेंट इत्यादी शेवंतीच्या विविध जाती आहेत. आम्ही आमच्या शेतात पूर्णिका जातीची शेवंती लावली आहे. पूर्णिमा जातीच्या रोपांवर कीड आणि रोगांचा सहज परिणाम होत नाही. त्यामुळे आम्ही त्याही लावल्या आहेत, असे रेड्डी सांगतात.





