मुंबई : (IMD 2 August 2024) मुंबईसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून (IMD) नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिणेचा मध्य भाग आणि लगतचा उत्तर द्वीपकल्पीय भारत, ईशान्य लगतच्या पूर्व भाग तसेच वायव्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात 106 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
IMD 2 August 2024 : ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये असा राहील पाऊस ?
मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील बऱ्याच भागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. संपूर्ण भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात चांगला पाऊस असून याच कालावधीत मध्य भारतात सरासरी ते सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा रेड अलर्ट राहणार असल्याचा अंदाज आहे.
आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ?
पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) यलो अलर्ट देण्यात आला आहे.


तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 