• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शून्य मशागत तंत्राच्या शेतीत रमलेला अवलिया

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2024
in यशोगाथा
0
शून्य मशागत तंत्रा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हयाच्या शेतीक्षेत्रात अलीकडील काळात नवनवे प्रयोग होत आहेत. पेशाने शिक्षक असलेल्या नौशाद खान पठाण यांचा त्यामध्ये अग्रक्रम आहे. परिसरात शून्य मशागत शेतीचा पॅटर्न रुजवित त्याच्या प्रसारावर त्यांनी भर दिला आहे.

असे आले शेतीत
नौशादचे वडील सरदार खान पठाण हे शेतकरी. त्यामुळे नौशाद यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी जिल्हा परिषदेत शाळेत पूर्ण केले. त्यानंतर सहा विषयात त्यांनी एमए केले. त्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी, अर्थशास्त्र यासह इतर एका विषयाचा समावेश आहे. त्याआधारे 2007 मध्ये ते जिल्हा परिषद शिक्षक म्हणून नोकरीत लागले.

 

शाळेत जपले वेगळेपण
रामनगर, रुई येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी 60 शेवग्याची झाडे लावली. शेवगा हा पौष्टीक घटक आहे. विद्यार्थ्यांना पोषणमूल्य मिळावे, याकरीता ही लागवड त्यांनी केली. जून 2022 लागवड आणि फेब्रुवारी 2023 मध्ये शेवग्याला शेंगधारणा झाली. त्याची तोडणी करुन भाजीचा आस्वाद मुलांना दिला. जुलै 2023 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरी प्रकल्प येथे बदली झाल्यानंतर या ठिकाणी 175 शेवगा झाडे आणि आंबा, पेरु, फणस, चिकू आणि इतर सर्व प्रकारच्या फळझाडाची लागवड केली. लोकवर्गणीतून ही लागवड करण्यात आली.

असे जाणले तंत्रज्ञान
पठाण यांनी 2011 मध्ये शेती कसण्यास सुरुवात केली. मल्चिंगवर टरबूज, खरबूज ही पिके घेण्यास सुरवात केली. ऑक्टोंबरमध्ये खरबूज, त्याच मल्चिंगवर मार्च महिन्यात टरबूज आणि जून महिन्यात कपाशी याप्रमाणे एकाच मल्चिंगवर तीन पिके विना मशागत तंत्राने घेण्यास सुरुवात केली. तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर होत होता. 2016 मध्ये कोल्हापूरचे प्रताप चिपळूणकर यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. पठाण यांच्याकडून वापरले जाणारे तंत्र हे शून्य मशागत तंत्र असल्याचे चिपळूणकर यांनी सांगितले. तेव्हापासून नांगरणी, वखरणी बंद करुन, आहे त्यावेळी केलेल्या बेडवर वेगवेगळ्या प्रकारची पीके घेण्यावर पठाण यांनी भर दिला आहे.

 

जमिनीचा वाढला कर्ब
नौशाद सांगतात, की शून्य मशागत व्यवस्थापनामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब प्रचंड वाढलेला आहे. गेल्या 12 वर्षात त्यांच्या शेतीतील कोणत्याच पिकाचे अवशेष जाळण्यात आले नाही. व्हायरस असलेले पपईचे झाड, डाऊनी आणि इतर बुरशीजन्य रोग असलेल्या खरबूज, टरबूज व इतर वेली देखील जमिनीतच कुजविल्या. त्यानंतर घेतलेल्या पिकावर त्याचा कोणताच प्रादुर्भाव दिसून आला नाही. पपई काढणीनंतर लगेच त्याच बेडवर ढेमूस हे वेलवर्गीय पीक घेतले. त्यावरही कोणत्याच व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. ग्लायफोसेट तणनाशकामुळे तण जमिनीत कुजले. त्याचा फायदा असा झाला की, जमिनीत सूक्ष्म जीव आणि गांडूळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. केळी बागेतून भर पावसात स्वच्छ पाणी वाहिले. मशागत न केल्यामुळे डिझेल, पेट्रोलची बचतही होते त्यातून राष्ट्रीय संपत्ती वाचते.

अशी आहे शेती
शून्य मशागत तंत्राने ते शेती करतात. केळी पिकात आठ वर्षांपासून नांगरटी, वखरणी केली नाही. बेड देखील आठ वर्ष जुने आहेत. मात्र, यामध्ये दर तीन वर्षांनी मातीचा भर दिला जातो. ठराविक कालावधीनंतर बेड सपाट होत असल्याने याचा पर्याय अवलंबला जातो. उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने ढेंचा या हिरवळीच्या खताचा वापर करण्यावर भर राहतो. दक्षिण- पाश्चिमोत्तर असा ढेंचा राहतो. दुपारच्या सावलीपासून संरक्षण मिळण्याकरीता हा पर्याय अवलंबण्यात आला. त्याची उंची दहा फुटापर्यंत वाढल्यामुळे बागेत सावली होत असल्याने 15 मे च्या दरम्यान तो काढण्यात आला. काढताना त्याचे बुड मात्र तसेच जमिनीत ठेवले. परिणामी ते कुजून त्यापासूनही सेंद्रिय कर्ब जमिनीस उपलब्ध झाला आहे.

हळद लागवडीवर भर
गेल्या वर्षीच्या बेडवर हळदीची लागवड साडेतीन एकरात केली आहे. हळदीचे कंद पोसण्यासाठी एक मातीची भर दिला जातो. हळद लागवडीनंतर एक महिना त्यात भरपूर तण वाढू दिले जाते. एक-दोन टक्के कोंब दिसल्यानंतर त्याच्यावर हळद उगवणीपूर्वी ग्लायफोसेट 41 टक्के याचा फवारा घेतला जातो. त्याचा फायदा हळद पिकाला होतो. कंद लागण्याच्या अवस्थेत एक मातीची भर इंटर कल्टीवेटरच्या सहाय्याने दिली जाते. त्याशिवाय माती उकरण्यासाठी कोणतेच अवजार वापरले जात नाही. हळद काढणीकरीता ट्रॅक्टरमुळे बेड फुटतात. परिणामी टिकासचा वापर करुन हळद काढणी होते. त्यामुळे कंदच बाहेर येतात. 5-10 टक्के जमिनीत कंद राहिल्यास ते काढले जात नाही, ते दुसऱ्या हंगामात उगवल्यास पॅराकॉड डिक्लोराईड या तणनाशकाने त्यांची कोंब आणि पाने भाजून जातात आणि हळद निघत नाही. परिणामी दुसरे पीक घेणे शक्य होते. त्यामुळे हळदीचे उरलेले कंद ही जमिनीत कुजतात. एकरी 248 क्विंटल ओल्या तर 51 क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन 2021- 22 मध्ये झाले. एकरी ओल्या हळदीचे 160 क्विंटल आणि वाळलेल्या 31 कृविंटल अशा हळदीचे उत्पादन त्यांना झाले आहे.

 

Ajeet Seeds

 

नैसर्गिक केळी
केळी पिकात कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी केली जात नाही. पोंग्यात अळी आल्यानंतर तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकाचा वापर शेतकरी करतात. फक्त ड्रिपव्दारे नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य दिले जातात. त्यासोबतच ट्रायकोडर्मा, नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करुन देणारे जिवाणू, ह्यूमिक अॅसिडचा वापर केला जातो. एकंदरीत अन्नद्रव्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन, शून्य मशागत शेतीतंत्रज्ञाव्दारे, तणनाशकाव्दारे तण मारुन, मागील पिकाचे अवशेष जमिनीतच ठेवून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर आहे. त्यामुळे केळी, पपई सारख्या पिकावर रोग येत नाही, असा दावा नौशाद करतात.

केळी लागवड
हळदीच्या काढणीनंतर 1 मार्च 2023 ला केळीची लागवड केली. बेड मोडून केळीची लागवड केली असती तर 15 दिवसाचा कालावधी गेला असता, परिणामी तापमानात वाढ झाली असती. सोबतच नांगरटीसह इतर मशागतीवरही खर्च करावा लागता असता त्यातही बचत झाली, असे नौशाद खान सांगतात. केळीचे घड कापून घेतल्यानंतर केळीचे उभे खोड न तोडता; त्याची फक्त पानेच छाटायची. त्याचे मल्चिंग करायचे आणि दुसरा फुटवा वाढू दयायचा. पहिले खोड उभे असल्याने लवकर कुजण्यास मदत होते.

केळीचे अर्थकारण
नौशाद यांच्याकडे सात एकर शेती आहे. त्यातील साडेतीन एकरावर 5000 झाडे आहेत. 20 किलोचा एक घड अपेक्षित धरता. 100 टन मालाची उत्पादकता होते. याला सरासरी 10 रुपये किलोचा दर अपेक्षित धरता 10 लाख रुपये मिळतात. 75 हजार रुपयांची रोपे, 90 हजार रुपयांची खत, 50 हजार रुपयांचा तणनाशकावरील खर्च, 20 हजार रुपये मजुरांमार्फत फुटवे कापणे, अशा एकूण 2 लाख 35 हजार रुपयांचा खर्च होत आहे.

केळीनंतर पपई
तीन वेळा केळीचे पीक घेतल्यानंतर तणनाशकाचा वापर करुन ती वाळविली जाते. त्याच क्षेत्रात पपईची लागवड केली जाते. दोन झाडात अंतर दहा फूट तर दोन बेडमध्ये पाच फूट अंतर ठेवून ही लागवड होते. झाडे मोठी झाल्यानंतर सावली राहते. त्यामुळे पपईच्या फळांची प्रत सुधारण्यास यामुळे मदत होते. एकरी 55 टनापर्यंतची उत्पादकता त्यांना यातून साध्य झाली. पपईवर एकरी 50 हजार रुपयांचा खर्च होतो. याला सरासरी 10 रुपयांचा दर मिळतो. साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न यातून मिळते. पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा यातून होतो.

 

अशी होते बचत
नांगरटी, रोटाव्हेटर, बेड करणे, बेड फ्लॅट करणे, ड्रिपच्या नळ्या आंथरणे ही कामे वारंवार केलीच जात नाही. परिणामी सात एकर क्षेत्रात 25 ते 30 हजार रुपयांची बचत होते. सात एकर क्षेत्रासाठी नळ्या गुंडाळणे व आंथरणे या कामी 25 मजुरांची गरज भासते; परंतू हे काम दरवर्षी करीत नसल्याने त्यावरचाही खर्च वाचतो. पपई, तूर, हळद, टरबूज, खरबूज, कपाशी अशी सारी पिके शून्य मशागतीवर घेण्यात आली.

तणनाशक वापरातून सुधारला पोत
2011 पासून ग्लायफोसेट 41 टक्के, ग्लायफोसेट 71 टक्के, पॅरोकोड डिक्लोराईड या तनाशकांच्या वापरावर सातत्य ठेवण्यात आला आहे. त्याचा जमिनीवर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. उलट मेलेले तण सूक्ष्म जीवांचे खाद्य असल्यामुळे सुक्ष्म जीव आणि गांडूळांची जमिनीत वाढ झाल्याचे निरीक्षण आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही सेंद्रिय कर्ब वाढलेला असल्यास बुरशीजन्य रोगाचा जमिनीतून प्रादुर्भाव होत नाही. अशा जमिनीची मशागत करावीच लागत नाही. ट्रायकोडर्माचा निरंतर वापर केल्यामुळे इतर अपायकारक बुरशी आजपर्यंत आढळून आलेली नाही. जमिनीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असता तर हळदीसारखे कंदवर्गीय पिके आलीच नसती. लसूण, कांदा, वेलवर्गीय पिके आली नसती. आकस्मिक मर देखील आढळून आली नाही.

कृषी तज्ज्ञ म्हणून मान्यता
सोशल मीडियावर देखील नौशाद सक्रीय असतात. त्यांच्याव्दारे वापरले जाणारे डोज ते शेअर करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला. परिणामी कृषी तज्ज्ञ म्हणून ते नावारुपास आले आहेत.

संपर्क :
नौशाद खान पठाण,
मो. 9404082640

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • IMD 2 August 2024 : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात कसा राहील पाऊस ?
  • राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांचा पीक विमा अर्ज दाखल – धनंजय मुंडे

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: शून्य मशागत तंत्रसेंद्रिय कर्बहळद लागवड
Previous Post

IMD 2 August 2024 : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात कसा राहील पाऊस ?

Next Post

IMD कडून या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

Next Post
IMD कडून या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

IMD कडून या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.