इतर

कापूस भाव वाढणार का ? पहा आजचे कापूस बाजारभाव

पुणे : कापूस भाव वाढणार का ? आज आपण कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत. कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, अद्याप देखील कापसाला हवा तसा भाव मिळत नाहीये. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कापसाला कमी भाव मिळत आहे. सध्या कापसाला 7 हजार 500 ते 8 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला आहे. कापसाला येथे जास्तीत जास्त दर हा 8200 प्रतिक्विंटल मिळाला तर कापसाचे आवक 153 क्विंटल इतकी झाली आहे. तसेच देऊळगाव राजा या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 8080 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आज कापसाचे सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती झाली.

ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 5 एप्रिल (शुक्रवारी) रोजी उपलब्ध

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (03/4/2024)

अमरावती क्विंटल 64 7425
सावनेर क्विंटल 2400 7250
वडवणी क्विंटल 12 7800
आष्टी (वर्धा) क्विंटल 399 7400
मारेगाव क्विंटल 488 7325
पारशिवनी क्विंटल 624 7050
उमरेड क्विंटल 338 7400
देउळगाव राजा क्विंटल 600 7850
वरोरा क्विंटल 776 7000
वरोरा-माढेली क्विंटल 200 7350
वरोरा-खांबाडा क्विंटल 254 7000
काटोल क्विंटल 110 7200
मांढळ क्विंटल 65 7350
हिंगणघाट क्विंटल 6500 6500
वर्धा क्विंटल 1250 7450
सिंदी(सेलू) क्विंटल 2300 7700
फुलंब्री क्विंटल 153 8200
भिवापूर क्विंटल 230 7300
Planto Krushitantra

 

Ajeet Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button