• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांसाठी सुरू होतेय कृषी क्लिनिक योजना; आता थेट शेतात पोहोचणार कृषी डॉक्टर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2023
in शासकीय योजना
0
कृषी क्लिनिक
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

देशातील काही राज्यात लवकरच शेतकऱ्यांसाठी कृषी क्लिनिक योजना सुरू होते आहे. या योजनेतून आता थेट शेतात कृषी डॉक्टर पोहोचणार आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे शेतकरी हितासाठी विविध नवनवे उपक्रम राबवत आहेत. त्यातूनच ही अभिनव कल्पना पुढे आली आहे.

आतापर्यंत मानव आणि प्राण्यांसाठी क्लिनिकची सुविधा होती. ती आता शेतकऱ्यांसाठी, बांधापर्यंत राबविली जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीकविषयक कोणत्याही समस्येसाठी इकडे-तिकडे भटकावे लागणार नाही. कृषी क्लिनिक उघडणाऱ्या तरुणांनाही सरकार अनुदान देणार आहे.

बिहारमध्ये सुरू होतेय अभिनव योजना

कृषी क्लिनिक योजना देशात झारखंड, मध्य प्रदेश राज्यात सुरू झाली आहे. आता ती बिहार सरकारकडून सुरू केली जाणार आहे. बिहारच्या सर्व ब्लॉक स्तरावर हे कृषी क्लिनिक सुरू होतील. त्यातून शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध असतील. बिहारमधील 202 ब्लॉकमध्ये कृषी चिकित्सालय योजना सुरू करण्यात येणार आहे. बिहारचे कृषी मंत्री कुमार सर्वजीत आणि कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

कृषी क्लिनिक सुरू करण्यासाठी पात्रता

कृषी क्लिनिक योजनेचा लाभ फक्त तेच लोक घेऊ शकतील, ज्यांनी राज्य किंवा केंद्रीय विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही विद्यापीठातून कृषी पदवी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी आणि कृषी, फलोत्पादन विषयात पदवी घेतली आहे. ICAR किंवा UGC द्वारे मान्यताप्राप्त असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळेल. याशिवाय कृषी किंवा फलोत्पादनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेले डिप्लोमाधारक किंवा कृषी विषयात इंटरमिजिएट आणि रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र या विषयात पदवीधर असलेल्या पात्र उमेदवारांना योजनेचा लाभ मिळेल.

पिके, शेतीमधील रोगांशी संबंधित संपूर्ण माहिती

बिहारचे कृषी मंत्री कुमार सर्वजीत म्हणाले की, 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी क्लिनिक योजनेसाठी 4 कोटी 24 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पीक उत्पादनाशी संबंधित सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये माती परीक्षण सुविधा, बियाणे विश्लेषण सुविधा, कीड व रोग व्यवस्थापनासंदर्भातील सूचना, वनस्पती संरक्षणासंदर्भात फवारणी व फवारणीसाठी आवश्यक उपकरणे, तांत्रिक तपशील याबाबत स्थानिक पातळीवर माहिती दिली जाणार आहे.

योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील पिकांचे उत्पादन, उत्पादकता आणि उत्पादनांची गुणवत्ता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. बिहार राज्यातील सर्व 101 उपविभागांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत प्रत्येक उपविभागातील 2 गटांमध्ये कृषी दवाखाने स्थापन करण्यात येणार आहेत. या अंतर्गत, एक उपविभागाच्या ब्लॉक मुख्यालयात आणि दुसरा निवडलेल्या इतर कोणत्याही ब्लॉक मुख्यालयात स्थापित केला जाईल. या अंतर्गत ग्रामीण स्तरावर 202 तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कृषी क्लिनिक सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत

कृषी क्लिनिक उभारण्यासाठी एकूण अंदाजे 5 लाख रुपये खर्च आहे. यात सरकार 40 टक्के आणि कमाल 2 लाख रुपये अनुदान देईल. उर्वरित रक्कम अर्जदाराकडून जमा केली जाईल. या योजनेअंतर्गत निवडलेले लाभार्थी बँकेकडून कर्ज मिळवून योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच निवड झालेल्या लाभार्थ्यांना कृषी क्लिनिक उभारण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या इच्छेनुसार खते, बियाणे, कीटकनाशक परवाना, कस्टम हायरिंग सेंटरसह इतर अत्यावश्यक योजनांचा लाभ देण्यास प्राधान्य दिले जाईल.

Panchaganga Seeds

फवारणीवर 75 टक्के अनुदान

बिहारचे कृषी सचिव संजय म्हणाले की, कृषी क्लिनिक योजनेव्यतिरिक्त आता औषध फवारणी सेवा प्रदात्यांना फळबाग आणि पिकांवर औषध फवारणी शुल्क (कीटकनाशकांसह) 75 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाईल. आंबा, लिची, पेरू या फळझाडांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठी फेरोमोन ट्रॅप, लाईफ टाइम ट्रॅप आणि स्टिकी ट्रॅपवर अनुदान दिले जाईल. पहाडी भागात 5 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान दिले जाईल. या दोन्ही योजनांचा उद्देश शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांचे कीड आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी सरकारी यंत्रणा तसेच खाजगी क्षेत्राद्वारे मदत करणे हा आहे.

Planto Advt
Planto

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार; केंद्र सरकार सोडवणार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
  • राहुरी कृषी विद्यापीठाकडून शेतकरी बांधवांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी क्लिनिककृषी क्लिनिक योजनाकृषी चिकित्सालय योजनाकृषी डॉक्टर
Previous Post

तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार; केंद्र सरकार सोडवणार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Next Post

गव्हाच्या ‘या’ वाणांची लागवड केल्यास मिळते बंपर उत्पादन!

Next Post
गव्हाच्या 'या' वाणांची लागवड केल्यास मिळते बंपर उत्पादन

गव्हाच्या 'या' वाणांची लागवड केल्यास मिळते बंपर उत्पादन!

ताज्या बातम्या

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मेडिसिनल प्लांट फार्मिंग

मेडिसिनल प्लांट फार्मिंग: किसानों के लिए खुशहाली की नई चाबी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 10, 2026
0

शेतीची कामे

फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2026
0

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish