गहू हे एक असे अन्नधान्य पीक आहे, जे भारतासह जगभराला अन्नाचा मुख्य पुरवठा करते. भारत हा गव्हाचा मोठा उत्पादक देश आहे. गव्हाच्या लागवडीबरोबरच येथून मोठ्या प्रमाणावर गहूही निर्यात केला जातो. याच गहू लागवडीचे एक खास तंत्र आम्ही आपणास सांगणार आहोत. इथे सुचविलेल्या गव्हाच्या ‘या’ वाणांची लागवड केल्यास बंपर उत्पादन मिळते. पंजाब-हरियाणामध्ये या जातीच्या गव्हाची मुबलक प्रमाणात पेरणी होते.
गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना लवकर पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गव्हाची लवकर लागवड हा एक उपयुक्त पर्याय असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. बरेच शेतकरी सप्टेंबरच्या अखेरीस लवकर गहू लागवडीचे काम सुरू करतात. यासाठी चांगल्या दर्जाच्या सुधारित वाणांची निवड करावी, जेणेकरून गव्हाचे अधिक उत्पादन घेता येईल.
तीन टप्प्यात करा गव्हाची लागवड करा
कृषी तज्ज्ञांच्या मते, गव्हाची लागवड तीन टप्प्यात केली जाते, ज्यामध्ये लवकर लागवड, मध्यम लागवड आणि उशिरा लागवडीचा समावेश होतो. गहू लागवडीचा पहिला टप्पा 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत चालेल. जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर ते सप्टेंबरच्या अखेरीपासून 25 ऑक्टोबरपर्यंत गव्हाच्या लवकर वाणांची पेरणी करू शकतात. त्यासाठी बाजारातून प्रमाणित गव्हाचेच बियाणे खरेदी करावे.
WH 1105 – गव्हाच्या पेरणीसाठी सर्वात लोकप्रिय वाण
गव्हाच्या लवकर पेरणीसाठी WH 1105 हे सर्वात लोकप्रिय वाण आहे. हे वाण पेरणीच्या 157 दिवसांत 20 ते 24 क्विंटल प्रति एकर उत्पादन देऊ शकते. या जातीच्या गव्हाच्या रोपाची लांबी देखील केवळ 97 सेमी आहे आणि कमी उंच असल्याने वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे या जातीचे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. डब्ल्यूएच 1105 वाण यलो मोजॅक रोगाविरूद्ध ढाल म्हणून काम करते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारचे शेतकरी देखील मुख्यतः WH 1105 जातीचे बियाणे पेरतात.
गव्हाचे रोगप्रतिकारक्षम HD 2967 वाण
भारतात गव्हाच्या लवकर लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर HD 2967 वाण वापरले जाते. ही गव्हाची रोग प्रतिरोधक जात आहे, जिच्यामध्ये यलो मोजॅक लागण्याची शक्यता कमी असते. गव्हाची ही जात 150 दिवसांत पक्व होते, ज्यातून एकरी 22 ते 23 क्विंटल गहू मिळू शकते. एचडी 2967 जातीची गव्हाची झाडे प्रतिकूल परिस्थितीतही झपाट्याने वाढतात आणि सुमारे 101 सेमी उंचीपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच हा गहू काढल्यानंतर जास्त भुसाही तयार होतो. पंजाब आणि हरियाणातील माती आणि हवामानानुसार ही जात उत्तम आहे.
गव्हाचे नवीनतम विकसित PBW 550 वाण
PBW 550 ही गव्हाची नवीनतम विकसित जात रोग प्रतिरोधक देखील आहे, ज्यामुळे गव्हाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात रोग होण्याची शक्यता कमी असते. एका अंदाजानुसार, PBW 550 वाण पेरणीनंतर 145 दिवसांत पिकते आणि काढणीसाठी तयार होते. या जातीची पेरणी केल्यास एकरी 22 ते 23 क्विंटल गहू उत्पादन मिळू शकते.
गव्हाच्या प्रगत वाणांपैकी एक HD 3086
HD 3086 या जातीचाही गव्हाच्या प्रगत वाणांमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्याची लागवड केल्यास कोणतेही रोग तसेच हवामानातील अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळता येते. या वाणाची पेरणी केल्याने उष्ण वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण होते आणि गव्हाचे कणीसही रोगमुक्त राहतात. या जातीच्या बियाण्यापासून 156 दिवसांनी सुमारे 23 क्विंटल प्रति एकर उत्पादन घेता येते. पेरणीसाठी प्रति एकर 55 ते 60 किलो बियाणे आवश्यक आहे. या वाणामुळे यलो मोजॅकपासून संरक्षण होते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांसह इतर राज्यातील शेतकरी या जातीची लागवड करून कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- शेतकऱ्यांसाठी सुरू होतेय कृषी क्लिनिक योजना; आता थेट शेतात पोहोचणार कृषी डॉक्टर
- तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार; केंद्र सरकार सोडवणार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी