मुंबई – भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)च्या ताज्या अहवालानुसार आज, 27 जुलै रोजी राज्यभरात पावसाची स्थिती पुढीलप्रमाणे राहू शकेल

कोकण विभाग: कोकण किनारपट्टी भागात बहुतांश ठिकाणी सर्वदूर पाऊस राहील. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार, तर मुंबई, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ: विदर्भातील बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यांत 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर-मध्य व दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा: दोन्ही विभागांत काही ठिकाणी पाऊस राहील. पुणे आणि साताऱ्याच्या घाट माथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रासाठी आजचा जिल्हानिहाय अंदाज


जळगाव: तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
धुळे: जिल्ह्यात हलका पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार: हलका पाऊस व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
नाशिक: नाशिकच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह सरींचा अंदाज आहे, तर नाशिकच्या घाट क्षेत्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आगामी 4 दिवसांचा हवामान अंदाज (28 ते 31 जुलै 1026)
मंगळवार, 28 जुलै:
या दिवशी विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढेल; भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस राहील. दक्षिण कोकणात सर्वदूर आणि उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू राहील.
बुधवार, 29 जुलै:
पूर्व व पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात पावसाची तीव्र हजेरी राहील; गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कायम राहील. मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर उत्तर-मध्य व दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल.
गुरुवार, शुक्रवार – 30 आणि 31 जुलै:
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी पाऊस सुरूच राहील. 30 जुलैला विदर्भात बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून 31 जुलैला विदर्भातील पावसाचा जोर काहीसा ओसरून हलका ते मध्यम पाऊस राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात या दोन्ही दिवशी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल













