इतर

कांद्याला या बाजार समितीत मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : कांद्याला सर्वाधिक दर हा कोणत्या बाजार समितीत मिळाला ? कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केला. याचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निर्यातशुल्क मागे घ्यावे यासाठी नाशिक जिल्हयातील कांदा व्यापाऱ्यांनी १३ दिवस बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवले होते. यामुळे कांदा लिलावासाठी नेता आला नाही. आणि कांदा खराब झाला. मात्र, आता कांद्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे.

 

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

 

कांद्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा ३ हजार २०० रुपये मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार ६०० रुपये मिळाला असून कांद्याची ११ क्विंटल इतकी आवक झाली. तसेच सोलापूर बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांदा आवकेत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील कांदा दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत. दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढताना दिसून येत आहे.

 

चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।

 

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

 

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (21 /10/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 11 2600
कांदा (20/10/2023)
सोलापूर क्विंटल 17014 1900
धुळे क्विंटल 237 2600
जळगाव क्विंटल 459 1975
साक्री क्विंटल 680 2800
येवला क्विंटल 5000 3000
येवला -आंदरसूल क्विंटल 2500 3000
लासलगाव क्विंटल 8106 3100
लासलगाव – निफाड क्विंटल 1750 3200
लासलगाव – विंचूर क्विंटल 8196 3100
मालेगाव-मुंगसे क्विंटल 11000 3150
सिन्नर क्विंटल 1140 3200
सिन्नर – नायगाव क्विंटल 168 3250

 

Panchaganga Seeds

 

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button