तांत्रिक

हवामान आधारित फळपीक विमा योजनेला सुरुवात

प्रतिनिधी/पुणे
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने हवामानावर आधारित फळपिक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळ पिकांचा समावेश आहे. ही योजना कर्जदार /बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना ऐच्छिक आहे. कमी/ जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे व गारपीट यापासून आंबा, काजू व केळी या फळपिकांना निर्धारित कालावधी विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणे. नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही याची उद्दिष्टे आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक राहील.राज्य पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षासाठी राबविण्यास राज्य शासनाच्या ५ जून २०२० शासन निर्णयानुसार मंजुरी दिली आहे. मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी. लिंबू,डाळींब,पेरू आणि चिकू या ६ फळ पिकांसाठी १८ जिल्ह्यात व अंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब,केळी,काजू,द्राक्ष,आंबा आणि स्ट्राॅबेरी ही ८ फळपिके २३ जिल्ह्यात राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र स्ट्राॅबेरी हे पिक फक्त प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्यात लागू आहे.


योजनेची प्रमुख वैशिष्टे    
१ सदरची योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील फाल्पिकासाठी असेल.

२ जमीन भरण्याच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.

३ अधिसूचित फळपिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा अंबिया बहार पैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करू शकेल.

४ केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीसाठी विमा संरक्षांची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

अधिसूचित फळपिकांचे उत्पादन क्षमता    
अधिसूचित फळपिक        उत्पादनक्षम वय
पेरू                      ३

चिकू                    ५

संत्रा                     ३

मोसंबी                   ३

डाळींब                   २

लिंबू                     ४

द्राक्ष                     २

आंबा                    ५

काजू                     ५


अंबिया बहार  (विमा प्रस्ताव सादर करण्याची तारीख)    
फळपिक                  तारीख

द्राक्ष                     १५ ऑक्टोबर

मोसंबी                   ३१ ऑक्टोबर

केळी                     ३१ ऑक्टोबर

संत्रा                     ३० नोव्हेंबर

काजू                     ३० नोव्हेंबर

आंबा (कोकण)             ३० नोव्हेंबर

आंबा इतर जिल्हे           ३१ डिसेंबर

डाळींब                   ३१ डिसेंबर

स्ट्राॅबेरी                 १४ ऑक्टोबर

 

शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता    
योजनेत सहभागी होण्यासाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के रक्कम विमा हप्ता म्हणून शेतकऱ्यांनी भरावी व उर्वरित विमा हप्ता रक्कम केंद्र व राज्य सरकार भरणार आहे.पुढील दोन वर्षासाठी पिक विमा संरक्षित रक्कम कायम ठेवण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. इ निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या विमाकंपन्या संबंधित जिल्ह्यात काम पाहणार आहे.

सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, दिनांक ०१ ऑक्टोबर 2020 पासून फळपीक (केळी) विमा योजनेला सुरुवात झाली असून ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे तरी सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की, शेवटच्या तारखेची वाट न बघता आपण लवकरात लवकर पीक विम्याचा फॉर्म भरून घ्यावा.

सुचना-फळपिक विम्याचे निकष बदल केले असुन पुर्वीप्रमाणे नाहीत याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.याबाबत संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती घ्यावी.

 

Related Articles

Back to top button