हवामान अंदाज

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

मुंबई- राज्यात मान्सून सक्रिय असून कोकण, घाटमाथा तसेच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागांत जोरदार सरी कोसळत असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने 9 जुलैसाठी राज्यातील 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर 2 ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

देशात आज बांगलादेश लगतच्या प्रदेशसह राजधानी दिल्ली क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (छायाचित्रातील काळया भागात तुफान अतिवृष्टी, लाल भागात मुसळधार, तर पिवळ्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.)
देशात आज बांगलादेश लगतच्या प्रदेशसह राजधानी दिल्ली क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (छायाचित्रातील काळया भागात तुफान अतिवृष्टी, लाल भागात मुसळधार, तर पिवळ्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.)

मुंबई-कोकणात मुसळधार सुरूच

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चारही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. घाट परिसरात मात्र जोरदार पाऊस बरसू शकतो.
महाराष्ट्रात आज पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. घाट परिसरात मात्र जोरदार पाऊस बरसू शकतो.

पुण्यातील घाट भागात मुसळधार

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

राजस्थानचा काही भाग वगळता मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे.
राजस्थानचा काही भाग वगळता मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे.

मराठवाड्यात हलका-मध्यम पाऊस

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भातील 9 जिल्हे कोरडेच!

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत 9 जुलै रोजी पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

Related Articles

Back to top button