मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिणामामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाने वेग घेतला असून तळ कोकणासह मुंबई, पुणे यासह राज्यातील विविध भागात पावसाळा सुरुवात झाली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागापासून वर्तविण्यात आली होती. मात्र, मान्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मान्सूनवर झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मान्सून हा तळ कोकणात रखडलेला होता. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढे सरकल्याने मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. मान्सून पुढे कारकायला सुरुवात झाली असून टाळ कोकणात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. त्यामुळे सकाळपासून सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाळी, कणकवली, माणगाव यासह मुंबईतील अंधेरी, दादर, कुर्ला, जोगेश्वरी, वांद्रे, गोरेगाव, मालाड, लालबाग, कांदिवली, भायखळा, परळ, विलेपार्ले, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
राज्यात मान्सून सक्रिय
राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी, काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा लागून आहे. दरम्यान, यंदा मान्सून लांबला असला तरी आता तो राज्यात दाखल झाला असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील आठवड्यात राज्यभरात दमदार पाऊस होईल, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भाला ऑरेंज अलर्ट
विदर्भात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे विदर्भात कमाल तापमानात २४ तासात मोठी घट झाली असून काही ठिकाणी 8-10 अंशाने तापमान खाली आल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच विजेच्या कडकडाटासह ३० ते ४० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.