Best Idea! झाडावर न चढता सहजपणे फळ तोडा; A1 भन्नाट देसी जुगाड! पाहा हा व्हिडिओ …

इंदूर : सहजपणे झाडावर न चढता बाटलीतून फळ तोडा. हा A1 भन्नाट देसी जुगाड तुम्हाला माहितीये का? मस्तच Idea लढवलेला हा व्हिडीओ पाहा. घंटोका काम मिनिटोमे, तेही हाताला मळ नाही आणि पायाला मळ नाही. (Fruits Pluck / Fruit Picking Anand Mahindra Desi Jugad Idea)
प्रत्येक व्यक्ती अवघड गोष्टी सहजतेने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी ते विविध प्रकारचे जुगाड किंवा तंत्राचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतात.
तसे तर आपला देशच नंबर 1 जुगाडू आहे. आपल्या देशात जुगाड बनवणाऱ्यांची आजिबात कमतरता नाही. विशेषत: कृषी क्षेत्रातील जुगाडने कोणतेही काम सोपे करण्यासाठी नवनवीन आयडिया समोर येत आहेत.
भन्नाट देसी जुगाड : झाडावर न चढता बाटलीतून फळ तोडा
आता हे जुगाड तंत्र आहे – झाडावर न चढता बाटलीतून फळ तोडा. प्लास्टिकच्या बाटलीतून हे अभिनव फळतोडणी यंत्र बनविण्याची आयडिया इंदुरमधून समोर आली आहे. बाटली, दोरी आणि काठीच्या साहाय्याने फळे तोडणे खूप सोपे झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ पाहा.
1 मिनिट 21 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. ज्यात कोल्ड ड्रिंकच्या बाटलीतून असे एक यंत्र बनवले आहे, ज्याचा वापर करून दूरवर, उंचावर असलेली झाडांवरील फळे अगदी सहज आणि कोणतेही कष्ट न घेता तोडता येतात.
विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला झाडावर चढण्याचीही गरज नाही. या देसी मशीनची आणखी एक खास गोष्ट आहे. फळ तोडल्यानंतर जमिनीवर पडून खराब होऊ शकते, अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. या देशी जुगाडाच्या मदतीने तुटलेली फळे जमिनीवर न पडता प्लास्टिकच्या बाटलीत येऊन पडतात.
या आयाडियाबाज, करामती व्यक्तीने आणि त्याच्या भन्नाट जुगाडाच्या व्हिडिओने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आनंद महिंद्रा यांनी फळे तोडण्याच्या या अशा देसी जुगाडाची खात्री होती, असे ट्विट करून कौतुक केले.
Not an earth-shattering invention. But I’m enthusiastic because it shows a growing culture of ‘tinkering.’ America became a powerhouse of inventiveness because of the habit of many to experiment in their basement/garage workshops. Tinkerers can become Titans of innovation. 👏🏼👏🏼👏🏼 pic.twitter.com/M0GCW33nq7
— anand mahindra (@anandmahindra) June 2, 2022

आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
आनंद महिंद्रा यांनी हा देसी जुगाड बनवणाऱ्याचे खुलेपणाने कौतुक केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले – हा पृथ्वीला कोणत्याही प्रकारे हानी न पोहोचवणारा शोध नाही, हे पाहून मला आणखी आनंद झाला. कारण ते वापरण्याच्या योग्य संस्कृतीचा परिचय देते. लोकांच्या तळघर किंवा गॅरेजमध्ये प्रयोग करण्याच्या सवयीमुळे अमेरिका शोधाचे सर्वात मोठे केंद्र बनले. प्रयोग करणारा आणि असे शोध यामुळेच कुणी जगाचा राजा बनू शकतो.





