हॅपनिंग

गिरणासह हतनूर, बोरी, सुकी फुल्ल; खान्देशात पाण्याचे टेन्शन मिटले!

जळगाव : जिल्ह्यातील जीवनदायिनी असलेल्या गिरणा धरणासह हतनूर, बोरी आणि सुकी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. नाशिक विभागातही 82% इतका समाधानकारक पाणीसाठा असल्याने आगामी रब्बी हंगाम तसेच पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत खान्देशात पाण्याचे टेन्शन मिटले आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही समाधानकारक आहे. जळगावला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरणही 70% भरले आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने थोडी ओढ दिल्यामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये पाण्याची पातळी थोडी स्थिर किंवा संथ गतीने वाढली असली, तरी मुख्य धरणांमधील सद्यस्थिती समाधानकारक आहे. मात्र, आगामी रब्बी हंगाम आणि उन्हाळ्याची पाण्याची गरज लक्षात घेता प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले जात आहे.


📞 Call Now

📞 Call Now

नाशिक विभागात 82% पाणीसाठा
नाशिक विभागात एकूण धरणांचा विचार करता गेल्या वर्षीच्या 85.35% च्या तुलनेत यंदा 82.04% साठा असून स्थिती गेल्या वर्षीच्या जवळपास सारखीच समाधानकारक आहे. राज्याचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या (89.16%) तुलनेत यंदा राज्यात धरणांमध्ये सुमारे 14.51% पाणी कमी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात पाणी अत्यंत कमी (केवळ 44.43%) असल्यामुळे राज्याची एकूण सरासरी खालावली आहे, तर त्या तुलनेत नाशिक व खान्देश विभागाची स्थिती (82.04%) उत्तम आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाणीसाठा
जलसंपदा विभागाच्या 4 ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व 134 धरणांमध्ये एकूण 68.78% उपयुक्त पाणीसाठा झाला असून, एकूण साठवणूक 7,31,690 द.ल.लि. (ML) वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील 100% किंवा त्याहून अधिक भरलेल्या प्रमुख प्रकल्पांची यादी अशी –
पूर्ण भरलेले मोठे आणि मध्यम प्रकल्प (100%+)
• सुकी मध्यम प्रकल्प: 101.28% (40,360 ML)
• बोरी धरण: 100.30% (25,100 ML)
• ऊर्ध्व तापी हतनूर धरण: 100% (2,55,00 ML)
गतवर्षीचा साठा: गेल्या वर्षी याच दिवशी हतनूरमध्ये 92.24% पाणीसाठा होता. याचाच अर्थ गेल्या वर्षीपेक्षा यंदा हतनूरमध्ये चांगली स्थिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

वाघूर धरण
• _चालू पाणीसाठा:_ 175.14 द.ल.घ.मी. (70.56%).
• _गतवर्षीचा साठा:_ गेल्या वर्षी या दिवशी वाघूर धरण 100% भरलेले होते.
गिरणा धरण (नाशिक – खान्देशसाठी महत्त्वाचे)
• खान्देशातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, नाशिकच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे यंदाही यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला आहे.
• _चालू पाणीसाठा:_ 519.51 द.ल.घ.मी. (99.23%).
• _गतवर्षीचा साठा:_ याच दिवशी गेल्या वर्षी विरणा धरण 100% भरले होते.
पूर्ण भरलेले लघु पाटबंधारे (M.I.) तलाव (100%)
• कांग लघु प्रकल्प: 7,630 ML
• लोंढरी साठवण तलाव: 2,560 ML
• गंगापुरी लघु प्रकल्प: 2,300 ML
• वेलहाळे लघु प्रकल्प: 1,990 ML
• जोंधळखेडा: 1,830 ML
• कृष्णपुरी लघु प्रकल्प: 1,810 ML
• बिलवाडी लघु प्रकल्प: 1,520 ML
• चारठाणा लघु प्रकल्प: 1,270 ML
• खडकीसिम लघु प्रकल्प: 1,100 ML
• कुंझर-2 लघु प्रकल्प: 1,010 ML
• आर्डी लघु प्रकल्प: 810 ML
• दिघी-2 लघु प्रकल्प: 80 ML


📞 Call Now

📞 Call Now

नाशिक विभाग (दृष्टिक्षेपात)
नाशिक प्रशासकीय विभागातील, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील सर्व लहान-मोठ्या धरणांतील सध्याची स्थिती –
धरणाचा प्रकार | एकूण संख्या | आजचा उपयुक्त साठा (द.ल.घ.मी.) | चालू वर्षाची टक्केवारी | गेल्या वर्षीची टक्केवारी
• मोठे प्रकल्प | 22 | 3,392.73 | 90.93% |99.25%
• मध्यम प्रकल्प | 55 | 940.77 | 77.60% | 68.90%
• लघु प्रकल्प | 462 | 552.43 | 54.57% | 53.58
• एकूण विभाग (सर्व धरणे) | 539 | 4,885.93 | 82.04% | 85.35%
महाराष्ट्र राज्य (दृष्टिक्षेपात)
• संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व 6 महसूल विभागांमधील एकूण 3,032 धरणांची एकत्रित आकडेवारी अशी –
• एकूण धरणांची संख्या: 3,032 प्रकल्प.
• आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा: 30,467.33 द.ल.घ.मी..
• चालू वर्षाची सरासरी टक्केवारी: 74.65%.
• गतवर्षीची याच दिनांकाची टक्केवारी: 89.16%.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button