पल्लवी खैरे
नवी दिल्ली : Kapus Bajarbhav… सध्या नवीन कापसाची बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत असून इतर पिकांसारखी कापसाचीदेखील पावसामुळे दुरावस्था झाली आहे. परंतु येणारा काळ हा कापसासाठी चांगला असण्याची दाट शक्यता आहे. कारण जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती पाहिली तर ऑक्टोबरमध्ये कापसाचे भाव जवळजवळ 14 टक्क्यांनी वाढले. तसेच याचा परिणाम देशांतर्गत कापसाच्या दरवाढीत दिसून येईल. चला तर मग जाणून घेवू या कापसाची आंतरराष्ट्रीय सद्यस्थिती व बाजारभाव… चीनच्या कापूस धोरणावरही दर अवलंबवून असतात. यावर्षी कसे असेल चीनचे कापूस धोरणं माहिती करून घेऊ …
आंतराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात वाढ झाली आहे. कापूस बाजारावर थोडासा दबाव जाणवत असला तरी तो फार महत्त्वाचा आहे. कापसाच्या किमतीत आज बराच बदल होत आहे. USDA ने त्यांच्या अमेरिका आणि जागतिक कापूस पुरवठा व मागणीचा महिन्याचा अंदाज अहवाल नुकताच सादर केला. या अहवालातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे..
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
अमेरिकेत कापसाचा दर काय?
सध्या अमेरिकेत कापसाचे दर 1 डॉलर 15 सेंटवर असताना आपल्याकडे कापसाचे दर सात हजारांवर होते. आता तेथील दर 1 डॉलर 25 सेंटवर आहेत. यामुळे भारतात कापसाचे दर 8 हजार 500 ते 9 हजार रुपयांच्या आसपास आहे. हे दर सध्या तरी कायम राहणार आहेत. अमेरिकेत कापसाचे उत्पादन सध्या बऱ्यापैकी असल्याने हे भाव स्थिर राहतील.
आंतरराष्ट्रीय कापसाचे क्षेत्र आणि उत्पादन
USDA च्या अहवालानुसार, जागतिक 2022-23 मधील कापसाचे क्षेत्र 32.9 दशलक्ष हेक्टर (81.4 दशलक्ष एकर) आणि उत्पादन 121.1 दशलक्ष गाठी असेल. प्रत्येकी 217.72 किलोग्रॅम असा अंदाज आहे. जे मागील वर्षाच्या 118.40 लाख गाठींच्या तुलनेत 2.6 लाख गाठी (2.23%) जास्त आहे. जगातील दोन प्रमुख कापूस उत्पादक देश म्हणजे चीन आणि भारत यांचा 2022-23 मध्ये प्रत्येकी 27.5 लाख गाठींचा अंदाज आहे तर अमेरिका (16.5 दशलक्ष गाठी), ब्राझील (13.2 दशलक्ष गाठी) आणि पाकिस्तान (6.2 दशलक्ष गाठी) चा उत्पादनाचा अंदाज आहे. चीन आणि भारतातील कापसाचे क्षेत्र 2022-23 दरम्यान, अनुक्रमे 3.10 ते 3.15 दशलक्ष हेक्टर (7.8 दशलक्ष एकर) आणि 11.96 ते 12.7 दशलक्ष हेक्टर (31.4 दशलक्ष एकर) पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
चीनच्या कापूस धोरणावर दरही अवलंबवून
जागतिक कापसाचा व्यापार 2022-23 मध्ये अंदाजे 47.6 दशलक्ष गाठींचा आहे. जो मागील हंगामापेक्षा 2 दशलक्ष गाठी जास्त आहे. परंतु, 2020-21 च्या विक्रमापेक्षा 1 दशलक्ष गाठी कमी आहे. जगाचा विचार करता आजही कापसाच्या उत्पादनात तसेच आयात करण्यात चीनचा पहिला क्रमांक अबाधीत आहे. भारत उत्पादनात तसेच निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर अमेरिका निर्यातीत अव्वल आहे. याचाच अर्थ जागतिक कापूस अर्थकारणावर चीनच्या कापूस धोरणाचा थेट प्रभाव पडतो. कापसाच्या दरातील जागतिक चढउतारही चीनच्या धोरणांवर अवलंबवून असते. जागतिक कापूस गिरणी वापराच्या अंदाज अहवालानुसार चीन 2022-23 मध्ये सर्वाधिक 10.5 दशलक्ष गाठी कापसाची आयात करेल असा अंदाज आहे. याचा परिणाम कापसाच्या जागतिक व्यापारावर होणार असून दरात गेल्या वर्षी इतकी नसली तरी बऱ्यापैकी तेजी कायम असेल.
कापसाचे भाव कसे ठरतात?
सध्या अमेरिकेच्या बाजारात कापसाचा एक पाऊंड रुईचा भाव हा एक डॉलर 15 सेंट आहे. 2.2 पाऊंड म्हणजे एक किलोग्रॅम. यानुसार प्रति किलो रुईचा दर हा 2.464 डॉलर इतका होतो. एक डॉलरचा विनिमय दर 80 रुपये गृहीत धरल्यास हा दर 197.12 रुपये प्रति किलोग्रॅम रुई होतो. एक क्विंटल कापसापासून 35 किलो रुई मिळते आणि 64 किलो सरकी निघते. त्यामुळे एक क्विंटल कापसापासून रुईचे सहा हजार 899 तर एक हजार 920 रुपये सरकीचे असे एकूण आठ हजार 819 रुपये होतात. म्हणजेच आठ हजार ते आठ हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळू शकतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇