मुंबई : Potato Farming… बटाटे जमिनीत उगतात हे कोणालाही सहजपणे सांगता येईल, आणि हे सांगणे किंवा ऐकणे काही विशेष देखील वाटणार नाही. कारण यात नवीन असे काहीच नाही. मात्र या ऐवजी बटाटे हवेतही उगतात, असे सांगितले तर कोणीही आपल्याला वेड्यात काढल्या शिवाय राहणार नाही. परंतु, बटाटे हवेतही उगतात हे सिद्ध करून दाखविले आहे, हरियाणातील करनाल जिल्ह्यातील बटाटा तंत्रज्ञान केंद्राने हे वाचल्यानंतर तुम्हालाही त्यांनी हि किमया नेमकी साधली कशी? त्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला? असे प्रश्न पडले असतीलच… त्यामुळे आम्हीही आजच्या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग वाचूया सविस्तर.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
बटाटे हवेत उगतात हे तुम्हाला ऐकायला जरी वेगळे वाटत असले, तरी हे खरे आहे. एरोपोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. हरियाणा राज्यातील करनाल जिल्ह्यातील बटाटा तंत्रज्ञान केंद्राने या एरोपोनिक तंत्रज्ञानावर (Aeroponic Potato Farming) काम केले असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बटाटे उगविण्यासाठी आता जमीन आणि मातीची गरज नाही. या तंत्रज्ञानामुळे कमी पडत असलेल्या जमिनीची गरज पूर्ण करता येणार आहे. त्याच बरोबर उत्पादनही १० पटीने वाढविता येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन अधीक उत्पन्न घेता येणार आहे. त्यामुळे बटाटा तंत्रज्ञान केंद्राला मिळालेल्या या यशानंतर कृषि विभागाने इतर राज्यातील फलोत्पादन विभाग व शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

लटकत्या मुळांना पोषकतत्व…
एरोपोनिक व हायड्रोपोनिक हे शेती करण्याचे दोन प्रकार कमी कालावधीत खूपच लोकप्रिय झाले आहेत. बऱ्याच लोक एरोपोनिक तंत्रज्ञान व हायड्रोपोनिक या तंत्रज्ञानांना एक सारखे समजतात. या दोन्ही प्रकारात शेती करण्याची पद्धत सारखी आहे. या प्रकारांमध्ये शेती करतांना मातीची गरज भासत नाही. परंतु या शेती प्रकारात ज्या पद्धतीने पोषकतत्व पिकांपर्यंत पोहोचविले जातात त्यात खूप मोठा फरक आहे. एरोपोनिक तंत्रज्ञानामध्ये पिकांना लटकत्या मुळांच्या माध्यमातून पोषकतत्व दिले जातात.

काय आहे एरोपॉनिक तंत्रज्ञान?
हाइड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये पिकांना पूर्णवेळ पाण्यात ठेवले जाते. तर एरोपोनिक शेती प्रकारामध्ये पानी स्प्रे करून पोषक तत्व दिले जातात. एरोपोनिक या प्रकारात बटाट्याचे पीक हे एका बंद वातावरणात घेतले जाते. यात पीक हे वरच्या बाजूला तर मुळे ही खालच्या बाजूने व अंधारात ठेवली जातात. खालच्या बाजूला पाण्याचे फवारे लावलेले असतात व फवाऱ्याच्या पाण्यात पोषकतत्व टाकून ती मुळांपर्यंत पोहोचविली जातात. वरच्याबाजूने पिकांना सूर्यकिरण तर खालच्या बाजूने पोषक तत्व मिळतात, या पद्धतीने पिकांची वाढ होत राहते.

कमी पाण्यात अधिक उत्पादन`
एरोपोनिक तंत्रज्ञान हे उत्पादनाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे. मात्र यासाठीचा सेटअप उभा करणे खर्चीक आहे. ज्याच्याकडे बागकामाचा चांगला अनुभव आहे. असे शेतकरी पॉलीहाउस उभारून चांगल्या पद्धतीने बटाट्याचे उत्पादन घेवू शकतात. या शेती प्रकारात अत्यंत कमी पाण्याची आवश्यकता असल्याने कमी पाणी असलेल्या भागात देखील शेतकरी याचा सेटअप उभारून चांगले पीक घेऊ शकतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇