मूळ कर्नाटकातील रोजा रेड्डी यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांची कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली. आपल्या ओसाड जमिनीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी या क्षेत्रात केवळ प्रभुत्व मिळवले नाही तर दरवर्षी 1 कोटींची उलाढाल करत आहेत.
कर्नाटक : मेट्रो शहरातील मोठ्या तांत्रिक कंपनीत काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण कर्नाटकातील डोनाहल्ली या गावात वाढलेल्या रोजा रेड्डी यांचे हे स्वप्न नव्हते. शेतीवर प्रेम असलेल्या रोजा यांना शेतकरी व्हायचे होते. पण हे स्वप्न फक्त रोजा याचं होतं, तिच्या कुटुंबाचं नाही. पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या रोजा यांच्या कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी शेतातील मातीत काम करण्याऐवजी शहरात चांगल्या पगाराची नोकरी करावी.
कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/5hVluXXF3J0
घरच्यांच्या इच्छेनुसार रोजा यांनी बी.ई. चा अभ्यास पूर्ण केला. लवकरच त्यांना बंगलोरमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. काही काळ रोजा यांनी त्यांची स्वप्ने बाजूला ठेवून कॉर्पोरेट नोकरी केली. पण 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या रोगाच्या आगमनानंतर गोष्टी बदलल्या.
सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी झाली?
लॉकडाऊनमध्ये घरातून काम आटोपून त्या घरी परतल्या. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका वृत्त संस्थेशी संवाद साधताना, रोजा यांनी उघड केलं की, त्यांचे वडील आणि भाऊ पूर्णवेळ शेतकरी आहेत. मात्र काही वर्षांपासून त्यांना शेतीचे मोठे नुकसान होत होते. त्या म्हणाल्या, “त्यांनी पूर्णपणे हार मानली होती आणि मला याबद्दल काहीतरी करायचे होते. मी शेती करावी अशी माझ्या कुटुंबाची इच्छा नसली तरी पण मी सेंद्रिय पद्धतींनी माझ्या शेतीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला होता. ऑफिसचे काम आटोपल्यानंतर दुपारी 4 वाजल्यापासून शेतात कामाला लागलो.
रोजा पुढे सांगतात की, “माझ्या कुटुंबाला खात्री नव्हती की, मी जमीन सेंद्रिय पद्धतीने सुपीक करू शकेन, कारण ते अनेक वर्षांपासून फक्त रासायनिक खतांचा वापर करत होते. ही रसायने आमच्या शेतीचे उत्पन्न कमी करण्याचे सर्वात मोठे कारण होते. खूप मेहनत करून मी त्यांना चुकीचे सिद्ध केले. आज रोजा नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी म्हणून काम करत आहेत. त्या 50 एकर विस्तीर्ण जमिनीवर सेंद्रिय भाजीपाला पिकवतात. त्यांचे म्हणणे आहे की, आता त्यांची वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपये आहे.
रासायनिक ऐवजी सेंद्रिय शेती महत्वाची का आहे?
रोजा यांनी सांगितले की, 2020 मध्ये जेव्हा त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली तेव्हा त्यांच्या कुटुंबाने, विशेषतः त्यांचे वडील आणि भावाने त्यांच्या निर्णयाला विरोध केला. नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांनीही या निर्णयावर शंका घेतली. ते म्हणाले की, रोजा यांच्याकडे चांगल्या पगाराची कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी असताना त्यांनी शेती का करावी.
रोजा पुढे म्हणतात, “लोकांचा असा विश्वास होता की केवळ रासायनिक शेतीमुळेच त्यांना चांगले उत्पादन मिळेल, पण हा विचार पूर्णपणे चुकीचा होता.” त्यांनी त्यांच्या आजोबांना सेंद्रिय शेती करताना पाहिले होते, परंतु त्यांचे वडील आणि भावाने इतके दिवस रसायन वापरले की मातीची गुणवत्ता खराब झाली आणि त्याचा परिणाम उत्पादनावर झाला.
दुष्काळग्रस्त चित्रदुर्ग जिल्ह्यातील डोनाहल्ली गावात, 20 एकर शेतजमिनीपैकी फक्त सहा शेतजमीन त्यांच्या कुटुंबाने डाळिंब पिकवण्यासाठी वापरली. उर्वरित जमिनीचा सिंचनात अडचणींमुळे उपयोग होत नव्हता. रोजा यांनी त्यांच्या कुटुंबाला न वापरलेल्या जमिनीवर शेती करू देण्यास सांगितले. त्यांना सहा एकरांवर स्वत:चा सेंद्रिय भाजीपाला फार्म उभारायचा होता.
लोक सेंद्रिय शेतीच्या तंत्राची उडवायचे खिल्ली
जेव्हा त्यांनी पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे नातेवाईक, इतर शेतकरी, गावकरी आणि अगदी उद्यान विभागाचे अधिकारीही सेंद्रिय शेतीचे तंत्र स्वीकारल्याबद्दल त्यांची चेष्टा करायचे.
रोजा सांगतात की, “त्यांनी इंटरनेटवरून सेंद्रिय शेतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीपणे करत असलेल्या अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्या काही महिन्यांतच त्यांच्या स्वत:चे सेंद्रिय भाजीपाला फार्म तयार करू शकल्या.” त्या सांगतात की, सुरुवातीला त्यांनी सोयाबीन, वांगी आणि शिमला मिरचीसह सुमारे 40 वेगवेगळ्या भाज्या पिकवल्या. त्यांनी त्यांच्या पिकांसाठी जीवामृत, नीमस्त्र, अग्निस्त्र यांसारखी सेंद्रिय खते आणि कीटकनाशकेही बनवली.
स्वतःचा मार्ग बनवा
रासायनिक जमीन समृद्ध सेंद्रिय शेतीमध्ये बदलली जाऊ शकते हे रोजा यांनी सिद्ध केले असले तरी, त्यांच्या उत्पादनाचे विपणन करणे हे त्यांच्यासमोर खरे आव्हान होते. रोजा पुढे म्हणतात, “त्यांना कधीच वाटले नव्हते की, सेंद्रिय उत्पादनाचे मार्केटिंग करणे इतके अवघड असेल. त्यांनी शेकडो किलो भाजीपाला पिकवला तरी भाजीपाला बाजार मिळणे फार कठीण होते.” त्या पुढे सांगतात की, त्यांच्या गावातील आणि आसपासच्या भागातील लोकांना सेंद्रिय शेती किंवा उत्पादनांबद्दल माहिती नव्हती. त्यांना त्याची गुणवत्ता किंवा फायदे माहित नव्हते आणि म्हणून कोणतेही खरेदीदार नव्हते.
रोजा राज्यभरात विविध ठिकाणी जाऊन आपल्या उत्पादनाची विक्री करत होत्या. याबद्दल बोलताना त्या म्हणतात, “त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन प्रथम चित्रदुर्गातील आठ सेंद्रिय शेतकऱ्यांचा गट तयार केला. त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांना जागा हवी होती, त्यासाठी त्यांनी प्रत्येक तालुक्यातील स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलल्या. त्यांनी घरोघरी जाऊन सेंद्रिय भाज्यांबाबत जनजागृती केली आणि त्यांना त्यांच्या बाजारात येण्यास सांगितले. त्यांनी आठवड्यातील दिवसागणिक वेगवेगळ्या प्रदेशात आमची बाजारपेठ सुरू केली आहे. राज्यभरातील सेंद्रिय शेतकर्यांच्या सहभागाने त्यांचे नेटवर्क अखेरीस वाढले.
ही सेंद्रिय बाजारपेठ उडुपी, दक्षिण कन्नड अशा इतर जिल्ह्यांमध्येही पोहोचली
रोजा यांनी Nisarga Native Farms नावाचा स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. जो बेंगळुरूमधील काही रिटेल आउटलेटसह देखील काम करत आहे. त्या म्हणतात, “आज माझ्या संपूर्ण कर्नाटकात माझ्या नेटवर्कमध्ये जवळपास 500 शेतकरी आहेत. आम्ही एक वर्षापासून राज्यभर सेंद्रिय बाजारपेठा उभारत आहोत. आम्हाला बंगळुरूसारख्या शहरातूनही मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्या आहेत.”
अशाप्रकारे, एका वर्षाच्या आत त्यांनी केवळ त्यांच्या कुटुंबाची जमीन एक समृद्ध सेंद्रिय शेतीमध्ये बदलली नाही, तर त्यांनी त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ आणि खरेदीदार देखील तयार केले आहेत. त्यांनी योग्यता सिद्ध केल्यानंतर त्या म्हणतात की, त्यांच्या कुटुंबाला त्यांची आवड आणि क्षमता याची खात्री होती, म्हणून त्यांनी पूर्णवेळ शेतकरी होण्यासाठी त्यांची कॉर्पोरेट नोकरी सोडली. त्यांच्यासमोर दुसरे आव्हान होते ते म्हणजे सिंचनाचे. “चित्रदुर्ग दुष्काळाने ग्रस्त असल्याने या भागात सिंचन करणे नेहमीच कठीण राहिले आहे.”
त्या सांगतात, सेंद्रिय शेतीच्या अनेक चांगल्या गोष्टींपैकी एक म्हणजे अजैविक शेती पद्धतींपेक्षा कमी पाणी लागते. मात्र सिंचनासाठी ठोस व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्या जमिनीवर तीन बोअरवेल्स व्यतिरिक्त, त्यांनी रेन हार्वेस्टिंगसाठी दोन तलावही बांधले आहेत.” रोजा यांनी तिच्या शेतासाठी ठिबक सिंचन प्रणाली देखील सेट केली आहे.
सेंद्रिय शेतीने स्वयंपूर्ण करून स्वप्न केलं पूर्ण
त्यांच्या गावातील सेंद्रिय शेतीत सर्वाधिक यशस्वी शेतकरी असण्यामागचे कारण म्हणजे आज अनेक शेतकरी रोजा यांच्याकडे शिकण्यासाठी येतात. हे तंत्र वापरून सुरुवातीला त्याची खिल्ली उडवणारेही यापैकी अनेक आहेत. रोजा सांगतात की, आत्तापर्यंत त्यांच्या गावातील सुमारे 25 शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. त्या म्हणतात, “मी त्यांना त्यांचे उत्पादन कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बाजारात विकण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्नही मिळते.”
वर्षाला करताहेत 1 कोटींची उलाढाल
आता त्यांनी त्यांची शेती 6 एकरांवरून 50 एकरपर्यंत वाढवली आहे आणि टोमॅटो, सोयाबीन, गाजर, वांगी, भेंडी, दुधी भोपळा, मिरची आणि काकडीच्या जातींसह सुमारे 20 प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहे. रोजा रेड्डी सांगतात, “मी दररोज सुमारे 500 ते 700 किलो भाज्या काढते आणि वर्षाला सुमारे 1 कोटी रुपये कमावते.” त्यांनी त्यांच्या शेतावर सुमारे 10 गावकऱ्यांना रोजगारही दिला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇