औरंगाबाद : Farmer Suicide… राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. सत्तेसाठी शिवसेनेत फुट पडली आणि आता पुन्हा पक्षाच्या मालकी हक्कावरून वादावादी सुरू आहे. या सत्ता संघर्षात एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण देखील सुरू आहे. मात्र, या सत्ता संघर्षात सर्वांना जागाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा विसर पडलेला दिसत आहे. गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यात तब्बल 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 400 शेतकऱ्यांनी पावसाळ्यात म्हणजेच पिके उगवण्याच्या हंगामात जीवन संपवले आहे.
कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/5hVluXXF3J0
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात 292 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबता-थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ध्येय घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील 292 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे पिके हातून गेली आहे. सरकराने मदतीची घोषणा केली असून अद्याप अनेक ठिकाणी मदत पोहचलेली नाही. त्यामुळे हतबल झालेली शेतकरी आत्महत्या करत जीव संपवत आहे. विशेष म्हणजे ज्या सप्टेंबर महिन्यात राज्यकर्ते कोणाचा कोणता पक्ष या राजकारणात व्यस्त होते, त्यावेळी मराठवाड्यातील 90 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) आकडेवारी (1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2022)
गेल्या 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2022 या काळात या आत्महत्या झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात 59, फेब्रुवारी महिन्यात 73, मार्च महिन्यात 101, एप्रिल महिन्यात 47, मे महिन्यात 76, जून महिन्यात 108, जुलै महिन्यात 83, ऑगस्ट महिन्यात 119, तर सप्टेंबर महिन्यात 90 असे एकूण 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
103 प्रकरणे ठरली अपात्र
नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोज्यातून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहे. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर या गेल्या नऊ महिन्यांत 756 शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. यातील 561 प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली आहे. तर 103 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तसेच 92 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक196 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇