मुंबई : भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर गेली आहे. ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्यानं निर्यात वाढली असल्याचं सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले.
थेट देवगड येथून…. तयारी ॲग्रोवर्ल्डच्या 29 एप्रिलच्या हापूस आंब्याच्या गाडीची…
इंडीयन कॉटन असोसिएशन म्हणजेच CAI नं जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या सहा महिन्यांदरम्यान भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर गेली आहे. भारताने 2022-23 हंगामात 15.59 लाख गाठींची निर्यात केली होती. सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले की, ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्यानं निर्यात वाढली. आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा भारतीय कापूस प्रति कँडी 3 ते 4 हजार रुपयांनी स्वस्त होता. अलीकडच्या आठवड्यात जागतिक किमती कमी झाल्यामुळे, कॉटलुक इंडेक्सच्या तुलनेत भारतीय किमती आता समतुल्य किंवा किंचित महाग आहेत.
बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांतील खरेदीदारांकडून भारतीय कापसाची मागणी मजबूत असल्याचं कर्नाटकातील रायचूर येथील सोर्सिंग एजंट रामानुज दास बूब यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितलं. लुईस ड्रेफस कंपनी, विटेरा आणि ओलाम यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आक्रमकपणे भारतीय कापूस खरेदी करत आहेत.
शेतातील पाईप फुटलाय ? पहा हा जुगाड नक्की उपयोगात येईल