• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा… जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 25, 2022
in इतर
0
गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा… जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे ः गव्हामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसताच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचे नियोजन करावे. वनस्पतीला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी 17 प्रमुख अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, त्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सल्फर, मॅग्नेशिअम, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन अन्नद्रव्ये वनस्पतीला मोठ्या प्रमाणात लागतात. तर लोह, बोरॉन, क्लोरिन, मँगेनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, निकेल हे वनस्पतीला खूप कमी प्रमाणात लागतात. गहू पिकात विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहे. जमिनीचा प्रकार, खत, पाणी व्यवस्थापन, जाती अशा अनेक घटकांचा अन्नद्रव्य उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो.

 

जस्ताची कमतरता

गव्हामध्ये उच्च प्रतीचे दाणे भरण्यासाठी जस्त हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. अल्कधर्मी व चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असते. स्फुरदाचा गरजेपेक्षा जास्त पुरवठा केल्याने जस्ताची कमतरता दिसते, कमतरता नवीन पानावर दिसून येते, शिरामधील भाग पिवळा दिसुन जर कमतरता जास्त प्रमाणात असेल तर पाने पांढरी होऊ शकतात आणि मरतात. झाडाची उंची आणि पानांचा आकार कमी होतो. शेणखताचा वापर न केलेले शेत तसेच जमिनीत पहिल्यापासून अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर जस्ताची कमतरता भासते. ती भरुन काढण्यासाठी झिंक सल्फेट 50 ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर 55 आणि 70 दिवसांनी 19:19:19 किंवा डीएपी 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

लोहची कमतरता

लोहाची कमतरता असल्यास गव्हाच्या नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या राहतात. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पानच पिवळे राहते. विम्ल जमीन, पाणथळ, जास्त प्रमाणात चुनखडी तसेच जमिनीत गरजेपेक्षा जास्त झिंक असल्यास लोहाची कमतरता बळावते. शेणखताचा वापर न केलेले शेत तसेच जमिनीत पहिल्यापासून अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर ही समस्या निर्माण होते. लोहाची कमतरता दिसून आल्यास फेरस सल्फेट 50 ग्रॅम किंवा चिलेटेड फेरस 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

नत्राची कमतरता

गव्हाच्या पिकाची जेव्हा फिक्कट पिवळे पाने दिसण्यास सुरुवात जुन्या पानापासून होते, तेव्हा प्रामुख्याने नत्राची कमतरता आहे असे लक्षात घ्यावे. यामुळे वाढीचा वेग कमी होवून पाने लहान राहू लागतात. लक्ष न दिल्याने पाने टोकाकडून पिवळी पडत जाऊन गळून पडतात, फुटवे कमी राहतात, पीक वेळेअगोदर पक्व होते, खुजे राहाते. ओंब्या छोट्या राहतात. जास्त सामू, हलकी मृदा, मृदेतील नत्र कमतरता, सेंद्रिय घटकांची कमतरता, जल असंतुलन या घटकांमुळे नत्राची कमतरता अधिक तीव्र होऊ शकते. या समस्येवर पीकवाढीच्या अवस्थेनुसार 100 ते 200 ग्रॅम युरिया किंवा 19:19:19 हे विद्राव्य खत प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

 

स्फुरदाची कमतरता

स्फुरदाची कमतरता झाल्यास पानावर, शिरावर, खोडावर जांभळे चट्टे दिसतात. जुन्या पानावर पहिला परिणाम होतो. वाढीचा दर मंदावतो, ओंब्या लहान राहतात. अति विम्ल जमीन, सेंद्रिय घटकाचा अभाव, जमिनीत चुनखडीचे जास्त प्रमाण, जमिनीतील स्फुरदाची कमतरता, गारठा ओलावा, अविकसित मुळे यामुळे कमतरता होऊ शकते. यावर उपाय म्हणून स्फुरदाची कमतरता दूर करण्यासाठी डिएपी किंवा 12:61:00 हे 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लक्षणे दिसल्यावर लवकरात लवकर नियोजनात योग्य तो बदल करून पिकाची वाढीची अवस्था पूर्ववत करता येऊ शकते. लक्षणे ज्या पट्यात दिसून येत आहेत त्याच पट्टयात हवा तो बदल केल्याने खर्च नियंत्रणात ठेवणे शक्य आहे, अन्नद्रव्य कमतरतेची पूर्तता करतेवेळी मिश्रण खतांचा वापर करावा. जेणे करून एका घटकाची कमतरता भरून निघाल्याने दुसर्‍या घटकाची कमतरता दिसून येणार नाही. कधी कधी एका घटकाच्या कमतरतेमुळे दुसर्‍या घटकाची देखील कमतरता निर्माण होते. मिश्रखते वापरल्याने ही अडचण देखील दूर होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: BoronChlorineGrainMagnesiumZinc sulfateअन्नद्रव्यअल्कधर्मीउपाययोजनालक्षणेशेणखतस्फुरदाची कमतरता
Previous Post

कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन… जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन

Next Post

एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.

Next Post
एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.

एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज... शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish