• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

IMD Weather Alert : पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार; आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता!

जाणून घ्या कुठल्या भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता; कुठल्या जिल्ह्यात अतिजोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2022
in हवामान अंदाज, हॅपनिंग
2
IMD Weather Alert : पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार; आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT
पुणे : सावधान! IMD Weather Alert नुसार, पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. 

राज्यातली नैऋत्य मोसमी म्हणजे मान्सूनचा पाऊस अजून थांबलेला नाही. गणेश विसर्जनापुरती राज्याच्या बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसली. गेल्या 2-3 दिवसात काही ठिकाणचा अपवाद वगळता पावसाचा जोरही राज्यात कमी राहिला. नाशिक, नगर, ठाणे, पालघरमधून पावसाचे क्षेत्र मुंबई व पुढे कर्नाटकातून दक्षिणेकडे सरकले होते. मात्र, आता हे पावसाचे क्षेत्र पुन्हा एकदा मुंबई, कोंकण आणि महाराष्ट्राकडे सरकत आहे.

पावसाचे ताजे अपडेट्स : रात्रीपर्यंतची स्थिती अन् पुढील 3-4 दिवसांचा वेध… Be Alert!

पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रीय होण्याची चिन्हे 

राज्यात अनेक ठिकाणी सप्टेंबरमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. अद्याप तरी हा पाऊस थांबणार नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागानेही तसा इशारा दिला आहे. राज्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यात पुन्हा एकदा सक्रीय होत असलेल्या मान्सूनमुळे पावसाची तीव्रता आजपासून आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

Depression over south Odisha moved west-northwestwards near latitude 19.8°N and longitude 83.3°E, about 10 km southeast of Bhawanipatna (Odisha).To move west-northwestwards across south Odisha and south Chhattisgarh during next 24 hours and weaken gradually. pic.twitter.com/5hxhGBHCNf

— India Meteorological Department (@Indiametdept) September 11, 2022

👆👆👆

दक्षिण ओडिशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र

दक्षिण ओडिशालगत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला आहे. भवानीपटना (ओडिशा) च्या सुमारे 10 किमी आग्नेय, 19.8°N अक्षांश आणि रेखांश 83.3°E जवळ पश्चिम-वायव्य दिशेने हा पट्टा पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगड, तसेच विदर्भ व अंतर्गत महाराष्ट्रात हा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेने सरकताना विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. पुढे हा तीव्र दाबाचा पट्टा हळूहळू कमजोर होईल.

Vikas Pashukhadya

IMD GFS Model निर्देशानुसार शक्यता

पावसाचा अंदाज घेणाऱ्या भारतीय हवामान विभागाच्या IMD GFS Model निर्देशानुसार,  12 सप्टेंबरपासून मुंबई- ठाणेसह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. एकूणच पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. हवामान विभागाचे पुण्यातील प्रमुख (आयएमडी पुणे) कृष्णानंद उर्फ केएस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

Jain Irrigation

या जिल्ह्यात अतिजोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा

मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे, सातारा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून वाढण्याची शक्यता असून कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळू शकतो. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस या भागाला झोडपून काढण्याची शक्यता आहे. राज्यातीच्या घाट भागातही तुफानी पावसाची शक्यता आहे. हे पाहता हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यावर जमा होत असलेले ढग

👆👆👆

कालची, 11 सप्टेंबरची सकाळची स्थिती

11/09/2022, रविवारी सकाळी 11.30 वाजेची ही ताजी उपग्रह स्थिती पाहा. सकाळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाव प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण-पूर्व विदर्भाचा काही भाग व मराठवाड्याचा बहुतांश भाग दाट ढगांनी व्याप्त झाला आहे. या प्रदेशांत व संलग्न भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. दक्षिण कोकणात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, जेथे गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला.

राज्यातील 11 सप्टेंबरच्या विजांच्या धोक्याचे अनुमान

हवामानाशी संबंधित केंद्र सरकारी संस्था आता हवामान अंदाज वर्तविण्यासाठी रिअल टाईम हाय रेझोल्यूशन सॅटेलाईट इमेजेसचा आधार घेतात. अशाच एका वेदर सिस्टिमवर, आज, रविवार, 11 सप्टेंबर रोजी राज्यात विजांचा धोका कसा राहू शकतो, ते वरील छायाचित्रातून दिसून येईल. लाल, नारंगी, पिवळसर रंग ज्या भागात आहे, तिथे धोका जास्त असू शकतो. या भागात कडकडाटासह पाऊस पडतो. गर्द हिरव्या भागातही जोरदार पाऊस होऊ शकतो. तुलनेने निळ्या भागात विजा नसतात आणि फारसा पाऊसही नसतो.

 

वीजेपासून राहा सावध.. Good News : A1 दामिनी ॲप करील मदत..!

 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र : यामुळेच आता ओडिशाला, विदर्भाला आणि कोकण किनारपट्टीला 4-5 दिवस तडाखा बसणार आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र : यामुळेच आता ओडिशाला, विदर्भाला आणि कोकण किनारपट्टीला 4-5 दिवस तडाखा बसणार आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल👇

  • Shocking : हा मुंबईतला पाऊस पाहिलात का? कधीही पाहिला नसेल असा 15-20 मिनिटांचा पावसाचा खेळ
  • Cloud Burst : जाणून घ्या राज्यात कुठे-कुठे झालाय ढगफुटीसदृश्य पाऊस ? एका मिनिटात 2 इंच मुसळधार

 

वंडरवर्ल्ड : राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम ईमेलचा वापर करणारी टेकसॅव्ही राणी! जग तेव्हा ई-मेल बाबत जाणतही नव्हते! No 1 Knows

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: IMD Weather Alertअतिजोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारापावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यताराज्यात मान्सून सक्रीय
Previous Post

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

Next Post

Good News : आता राज्यात सीएम किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6,000 रुपये अनुदान

Next Post
सीएम किसान सन्मान योजना

Good News : आता राज्यात सीएम किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6,000 रुपये अनुदान

Comments 2

  1. Pingback: पावसाचे ताजे अपडेट्स : रविवार, 11 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंतची स्थिती .. Be Alert! - Agro World
  2. Pingback: पावसाचे ताजे अपडेट्स : रात्रीपर्यंतची स्थिती अन् पुढील 3-4 दिवसांचा वेध... Be Alert! - Agro World

ताज्या बातम्या

एल निनो खरीप नियोजन केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान

एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2026
0

Narendra Modi Millets Kesar Mango Gift Europe Tour

जागतिक मंचावर भारताच्या कृषी वैभवाचे दर्शन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 21, 2026
0

Dept-CBU Maharashtra Krushi Vibhag Capacity Building Plan CBP महाराष्ट्र शासन कृषि विभाग

Dept-CBU: कृषी विभागाचा होणार कायापालट! शेतकऱ्यांसाठी ठरणार गुड न्यूज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2026
0

Monsoon Super El Nino IMD LPA Below Normal India Rain Monsoon 2026

आगामी मान्सून, खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 18, 2026
0

‘मान्सून! आनंदाची बातमी; समुद्रात ‘एल निनो’च्या दुष्परिणामांना कमी करू शकणाऱ्या घडामोडी!

‘मान्सून! आनंदाची बातमी; समुद्रात ‘एल निनो’च्या दुष्परिणामांना कमी करू शकणाऱ्या घडामोडी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 15, 2026
0

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

एल निनो खरीप नियोजन केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान

एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2026
0

Narendra Modi Millets Kesar Mango Gift Europe Tour

जागतिक मंचावर भारताच्या कृषी वैभवाचे दर्शन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 21, 2026
0

Dept-CBU Maharashtra Krushi Vibhag Capacity Building Plan CBP महाराष्ट्र शासन कृषि विभाग

Dept-CBU: कृषी विभागाचा होणार कायापालट! शेतकऱ्यांसाठी ठरणार गुड न्यूज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2026
0

Monsoon Super El Nino IMD LPA Below Normal India Rain Monsoon 2026

आगामी मान्सून, खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 18, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish