Home हवामान अंदाज ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

IMD कडून यलो अलर्ट जारी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होत जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, आज सकाळ पासूनच काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. आज हवामान विभागाकडून (IMD) या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 IMD कडून यलो अलर्ट जारी

यलो अलर्ट
पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या हवामान विभागाकडून (IMD) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Panchaganga Seeds

IMD : या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नाही
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पालघर, जालना, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, नांदेड, परभणी, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आला नसून येथे रिमझिम पावसाचा अंदाज आहे.

Planto Krushitantra

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇