Home शासकीय योजना या योजनेतून खतासाठी मिळणार 100% अनुदान

या योजनेतून खतासाठी मिळणार 100% अनुदान

या योजनेतून खतासाठी मिळणार 100% अनुदान

मुंबई (प्रतिनिधी) फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेच्या माध्यमातून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे.

 

पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |

 

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

 

Nirmal Seeds
Nirmal Seeds

राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यांतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे.

Shri Renuka Sales
Shri Renuka Sales

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇