• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गव्हावरील रोग, किडींच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2023
in कृषी सल्ला
0
गव्हावरील रोग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : रब्बीच्या हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकांपैकी गहू हे सर्वाधिक महत्वाचे पीक आहे. काही ठिकाणी हे पीक कांडी धरण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी उशिरा पेरणी झाल्यामुळे मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. गहू या पिकावर देखील वातावरणातील बदलांमुळे मावा, तुडतुडे, तंबेरा यासारख्या किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव झाल्यास काही उपाययोजना करणे गरजेचे असून त्या आपण जाणून घेणार आहोत.

गहू या पिकाची पेरणी शक्यतो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात केली जाते. उशिरा पेरणी झाल्यास उत्पादनात घट होते. अनेकदा वेळेवर लागवड करुन देखील उत्पादन घट होत असते ती पिकावर पडणार्‍या रोग, किडीमुळे. गहू या पिकावर ढगाळ वातारण तसेच रात्र आणि दिवसाच्या तापमानातील फरकाचा मोठा परिणाम होतो. अशा वातावरणामुळे गव्हावर मावा किडीचा प्रादुर्भाव होत असतो. दिवसा 28 ते 31 आणि रात्री 8-10 अंश सेल्सियस तापमान हे या किडीच्या वाढीसाठी पोषक असते.

मावा या किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या मागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर आढळून येतात. पानातील पेशीरस शोषून ते घेतात. त्यामुळे गहू पिकाचे पाने पिवळसर होतात. तसेच मावा ही किड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यामुळे पिकावर काळी बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्लेषण क्रिया बंद होवून पीक मरते. त्यामुळे या मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायामिथोक्झाम 1 ग्रॅम किंवा सिटामिप्रीड 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम निसोप्ली प्रत्येकी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे, यामुळे मावा किड नियंत्रणात येवून उत्पादनात होणारी घट कमी होण्यास मदत होते.

तुडतुडे : यापूर्वी गहू या पिकावर तुडतुडे या या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नव्हता; परंतु आता रोपावस्थेपासून वाढीच्या अवस्थेदरम्यान काही प्रमाणात याचा प्रादुर्भाव गहू या पिकावर होत असल्याचे दिसून येत आहे. तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (30 ईसी) 15 मि. लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास त्यांवर नियंत्रण मिळविता येते. पिकावर मावा आणि तुडतुडे एकाचवेळी आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज पडत आहे.

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

मावा किडीचा प्रादुर्भाव लक्षात घ्या
अनेक वेळा शेतकरी मावा किडीच्या विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकल्या जाणार्‍या चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीला तांबेरा समजून तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपायांचा अवलंब करतात. असे केल्याने मावा किडीचे नियंत्रण होत नाही. परिणामी, गहू पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखण्यासाठी चिकट द्रवाच्या स्वरूपातील काळ्या बुरशीच्या ठिकाणी बारीक काठीने किंवा गव्हाच्या पानाच्या साहाय्याने स्पर्श करावा. त्यातून माव्याची हालचाल होताना सहज दिसते. त्यामुळे मावा किंवा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.

तांबेरा :
महाराष्ट्रात गहू या पिकावर खोडावरील काळा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोन प्रकार आढळून येतात. काळा तांबेर्‍याचा प्रादुर्भाव हा पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतो येतो. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी, कुसळे या सर्व भागांवर या रोगाची लक्षणे दिसतात. जस-जसे तापमान वाढत जाते, तस-तसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. 15 ते 35 अंश से. तापमान तांबेरावाढीसाठी पोषक असते, तसेच आर्द्रताही पुरेशी लागते.

Nirmal Seeds

नारिंगी तांबेरा : नारिंगी तांबेरा हा पाने व खोडावरील देठांवर आढळून येतो. नारंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्यांच्या स्वरुपात तो दिसून येतो. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर दिसतात. 15 ते 25 अंश सेल्सिअस इतके तापमान त्याला पोषक असते.

तांबेराच्या नियंत्रणासाठी उपाय
तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच 200 मि.लि. प्रोपिकोनॅझोल प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. किंवा दोन ग्रॅम मॅन्कोझेब किंवा दोन ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

Ajit seeds

कोळी : गव्हाचे पीक वाढीच्या अवस्थेत असतांना पाण्याची कमतरता, सरासरीपेक्षा जास्तीचे तापमान आणि ढगाळ हवामान यामुळे गव्हावर कोळी या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही कीड गव्हाच्या रव्याच्या कणाएवढी लांब वर्तुळाकार, लाल-पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील पेशीरस शोषण करते. जाळी तयार करत नाही. या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक (80 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा डायकोफॉल 10 मि.लि. किंवा डायमिथोएट 15 मि.लि. किंवा बामेक्टिन तीन मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने किमान दोन वेळा आलटून पालटून फवारावे.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर हळदीचा उतारा; उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा नवा मंत्र
  • ऊस पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

Share this:

  • Facebook
  • X
Tags: उपाययोजनारब्बी हंगामरोग व किडी नियंत्रण
Previous Post

शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांवर हळदीचा उतारा; उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा नवा मंत्र

Next Post

कृषी सल्ला : हळद – फर्टीगेशन, करपा रोग, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन

Next Post
हळद

कृषी सल्ला : हळद - फर्टीगेशन, करपा रोग, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन

ताज्या बातम्या

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.