• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

Team Agro World by Team Agro World
March 19, 2023
in शासकीय योजना
0
विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका येाजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.

फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पद्धतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. तसेच त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे आणि म्हणूनच भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

Shriram Plastic

या योजनेसाठी अशी होते लाभार्थीची निवड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी. तसेच लाभार्थी निवडतांना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम, महिला गट, महिला शेतकरी द्वितीय आणि भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम देण्यात येते. प्रथम प्राधान्याच्या जेष्ठासूचीतील संपुर्ण अर्जावर कार्यवाही झाल्यानंतरच द्वितीय प्राधन्याच्या जेष्ठतासूचीनुसार निवड करण्यात येते.

या लाभार्थ्यांना मिळणार नाही लाभ

खाजगी रोपवाटीकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत.

असे मिळते अनुदान

टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात येते. रोपवाटीका उभारणीकरीता १००० चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या ५० टक्के २ लाख ७७ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. योजना प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने शेडनेट गृह, पॉलिटनेल, प्लास्टिक क्रेट व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर या चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहील. अन्यथा प्रकल्प अनुदानास पात्र असणार नाही.

उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी करुन अनुज्ञेय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान प्रथम हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतो. रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत द्वितिय मोका तपासणी करून उर्वरित ४० टक्के अनुदान दुसरा हप्ता लाभार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरीत करण्यात येतो.

Ellora Natural Seeds

रोपवाटीका धारकास बियाणे कायदा १९६६ अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना अभावी कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येते. भाजीपाला रोपवाटीकेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव- दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय नागपूर आणि उद्यान महाविद्यालय अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करावेत. अर्ज करताना , ७/१२ व ८ अ चे उतारे, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरिता संवर्ग प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. पात्र अर्जानुसार प्रवर्गनिहाय ज्येष्ठतासूची तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना सोडत प्रक्रियाबाबत अवगत करण्यात येते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • समुद्रात असूनही हा खड्डा कधीच भरत नाही
  • मशरुमच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती
Tags: nursery schemeउपविभागीय कृषी अधिकारीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनारोपवाटिका योजनाविषमुक्त उत्पादनविषमुक्त भाजीपला
Previous Post

समुद्रात असूनही हा खड्डा कधीच भरत नाही

Next Post

आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

Next Post
ॲग्रोवर्ल्ड

आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

ताज्या बातम्या

तेलंगणा

महाराष्ट्राच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

by Team Agro World
June 3, 2023
0

शेतकर्‍यां

शेतकर्‍यांनो काहीही न पिकविताही कमवाल एकरी 50 हजार रुपये

by Team Agro World
June 2, 2023
0

Onion Rate

Onion Rate : कांद्याला येथे मिळतोय असा दर ; पहा आजचे बाजारभाव

by Team Agro World
June 2, 2023
0

Pre Monsoon Rain

Pre Monsoon Rain : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

by Team Agro World
June 1, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर

by Team Agro World
June 1, 2023
0

Monsoon Update

Monsoon Update : मान्सून राज्यात कधी दाखल होणार ते जाणून घ्या ..

by Team Agro World
May 31, 2023
0

केळी

केळीला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

by Team Agro World
May 31, 2023
0

बाजार

कांद्याला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव ; वाचा आजचे बाजारभाव

by Team Agro World
May 30, 2023
0

Farmer Success Story

Farmer Success Story : 45 हजारांची सरकारी नोकरी सोडून सुरु केली काकडीची शेती

by Team Agro World
May 29, 2023
0

Cotton Price Today

Cotton Price Today : कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर

by Team Agro World
May 29, 2023
0

तांत्रिक

एकात्मिक शेती

एकात्मिक शेतीची कास – भाग 1

by Team Agro World
April 26, 2023
0

कृषी विषया

कृषी विषयाचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश होणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

by Team Agro World
April 25, 2023
0

आता शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत..

आता शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत..

by Team Agro World
April 25, 2023
0

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेतीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

by Team Agro World
April 19, 2023
0

जगाच्या पाठीवर

तेलंगणा

महाराष्ट्राच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

by Team Agro World
June 3, 2023
0

शेतकर्‍यां

शेतकर्‍यांनो काहीही न पिकविताही कमवाल एकरी 50 हजार रुपये

by Team Agro World
June 2, 2023
0

Onion Rate

Onion Rate : कांद्याला येथे मिळतोय असा दर ; पहा आजचे बाजारभाव

by Team Agro World
June 2, 2023
0

Pre Monsoon Rain

Pre Monsoon Rain : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

by Team Agro World
June 1, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group