• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मशरुमच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती

नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथील नणंद, भावजयीची कमाल

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2023
in इतर
0
मशरुमच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शहादा : समाजातील विविध क्षेत्रात महिलांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यात कृषी क्षेत्र देखील मागे नाही. केवळ शेतीपुरक जोडधंदा नाही तर शेतीतील यथासांग माहिती, परंपरेने आलेल्या ज्ञानाला व्यापक दृष्टी देवून यशस्वी शेती करण्याचे कार्य देखील महिला शेतकरी करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथील नंणद, भावजायी यांनी देखील दहा बाय दहाच्या खोली वजा जागेत मशरुमची शेती (mushroom farming) करुन आर्थिक प्रगती साधली आहे. सोबत गावातील महिलांनाही प्रशिक्षित करुन आर्थिक उन्नत्तीचा मार्ग खुला करुन देत आहेत.

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, जिद्द व चिकाटीचा अवलंब करत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी या पाच किलोमीटर अंतरावर देवमोगरा पुनर्वसातील किरताबाई वसावे व लिलाबाई बसावे या दोन महिला आदर्श महिला शेतकरी आहेत. मइच्छा तिथे मार्गफ या उक्तीला सार्थ ठरवित किरताबाई व लिलाबाई वसावे या नणंद भावजयी यांनी कुटुंबाला अर्थसाक्षर (economic progress) बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अस्मानी सुलतानी संकटावर मात करीत आज मशरूम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवित आहेत. आपल्या प्रयत्नांतून केवळ आपलीच प्रगती व्हावी या उद्देशाला छेद देत शेकडो महिला शेतकर्‍यांना प्रशिक्षण देत आहेत. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे बारमाही पिक असलेल्या ममशरूमफ ची शेती त्या करीत आहेत.

पतीकडून मिळाली प्रेरणा
लिलाबाई यांना त्यांच्या पतीपासून मशरुमची शेती करण्याची प्रेरणा मिळाली. गुजरात राज्यातील डायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सुरत शहरात त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु, व्यवसाय करता करता मन गावाकडे वळू लागले. जणू काही गड्या आपला गावच बरा.., गावाकडे गेले पाहिजे, बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे, असे वाटू लागले. त्यामुळे गावी घरी परतलो. परंतु, घरची जबाबदारी आणि जोडीला व्यवसायाची पिंड स्वस्थ बसू देईना. कमीत कमी भांडवलात जास्त उत्पादन देणारे पीक कोणते, त्यासाठी पोषक वातावरण व हवामान याचा अभ्यास करीत असतांना मशरुम पिकाविषयी समजले. आणि मशरूमचे पिक घेण्याचे ठरल्याचेही त्या सांगतात. मशरुमची शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2018-19 साली किरताबाई व लिलाबाई वसावे या नणंद भावजयी यांनी दहा बाय दहाच्या जागा वजा खोलीत मशरुमची शेती करण्याला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी 100 बॅगांमध्ये मशरुची लागवड केली. त्यासाठी त्यांना 4 हजाराच्या जवळपास खर्च आला. अत्याधुनिक पध्दतीने शेती केली असती तर आणखी खर्च वाढला असता. त्यामुळे वातावरणाचा अभ्यास करुन खोलीचे वातारवण नैसर्गिक पद्धतीने बदलुन खर्च कमी केल्याचेही त्या सांगतात.

Nirmal Seeds


पहिल्याच प्रयत्नात 16 हजारांचे उत्पन्न

सुरुवातीला 100 बॅगांमध्ये मशरुमची लागवड केली. मशरुम हे पिक कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30 दिवसात येत असल्याने पहिल्याच महिन्यात व पहिल्याच प्रयत्नात चांगले उत्पादन मिळाले. तब्बल 16 हजारांचे उत्पन्न मशरुमच्या शेतीतून मिळाल्याने आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.मशरुम शेतीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यानंतर लिलाबाई, किरताबाई व राजेंद्र वसावे यांनी गावातील तसेच इतर भागातील शेकडो महिलांना प्रशिक्षण दिले. यामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून या महिला देखील महिन्याकाठी 10 ते 16 हजारांपर्यत उत्पन्न मिळवित आहेत. येणार्‍या काळात आणखी काही महिलांना प्रशिक्षित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

Ajit Seeds

अनेक जिल्ह्यात विक्री
लिलाबाई आणि किरताबाई यांना मशरुमच्या शेतीतून महिन्याकाठी 20 ते 25 हजारांचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या शेतात उत्पादीत होणारे मशरुम नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, मुंबई यासह गुजरात राज्यात विक्री होत आहेत. घरी बसल्या जरी या मशरुमची विक्री केली तरी 300 रुपये प्रति किलो दराने या मशरुमची विक्री होत असल्यानेे वर्षभरात 1 ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्या सांगतात.

महिन्याला 60 किलो उत्पादन
एक महिन्यात म्हणजेच अंदाजे 25 ते 30 दिवसांत दहा बाय दहाच्या खोली वजा जागेत मशरूमसाठी लागणारे 20 ते 30 अंश तापमान व 70 ते 90% आर्द्रता असे वातावरण ठेवल्यास 40 ते 60 किलो मशरूमचे उत्पादन होऊ शकते. सुरवातीला वातावरणाचा अंदाज आणि संयम राखला तर नक्कीच दर महा एक महिना 10 ते 12 हजार रुपये कमवू शकतो, असे त्या सांगतात.

Tags: Economic ProgressMashroom FarmingMushroom FarmingNandurbar
Previous Post

या अभियानाअंतर्गत 100 दिवसात मिळणार अनुदान ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

Next Post

Pomegranate Rate : डाळिंबाला या बाजर समितीत असा मिळतोय भाव

Next Post
Pomegranate

Pomegranate Rate : डाळिंबाला या बाजर समितीत असा मिळतोय भाव

ताज्या बातम्या

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

AIF Agri Infrastructure Fund

AIF Scheme : या योजनेत शेतकर्‍यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

पॉट इरिगेशन

उत्तर कर्नाटकात 2,000 वर्षे पुरातन पॉट इरिगेशन सिंचन प्रणाली पुनरुज्जीवित!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

आंध्र प्रदेशातील पिके

सिंचनाच्या “या” पद्धतीमुळे दुष्काळापासून वाचली आंध्र प्रदेशातील पिके!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड : वार्षिक 4% व्याजाने आता सहज मिळणार शेतकरी कर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 20, 2023
0

AgroWorld Magazine Sepr 2023

AgroWorld अॅग्रोवर्ल्ड मासिक सप्टेंबर 2023 Great Positive Stories

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 18, 2023
0

सीताफळ लागवडीतून साधला उन्नतीचा मार्ग !

सीताफळ लागवडीतून साधला उन्नतीचा मार्ग !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 18, 2023
0

Return Monsoon Delayed India

पाऊस सुरूच राहणार; रिटर्न मान्सूनची तारीख लांबणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 18, 2023
0

तांत्रिक

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2023
3

कृषी सल्ला : खोडवा ऊस, सुरू ऊस पीक व्यवस्थापन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2023
2

कृषी सल्ला : आडसाली ऊस लागवड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 9, 2023
1

झूम खेती

ईशान्य भारतातील झूम खेती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2023
0

जगाच्या पाठीवर

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

AIF Agri Infrastructure Fund

AIF Scheme : या योजनेत शेतकर्‍यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group