मुंबई : शेतकऱ्यांचा कल हा फळ पिकांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शेतकरी फळ पिकाची लागवड करतात. मात्र, त्यांना योजनेचा लाभ हा लवकर मिळत नाही. पण आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. एका अभियानांतर्गत शंभर दिवसात अनुदान मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या अनुदानाबद्दल..
देशभरातील शेतकरी फळपिकांची लागवड करत आहेत. फळबाग लागवडसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. त्यातीलच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHB Subsidy Schemes) ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100 दिवसात अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळण्यासाठी आधी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागत होता मात्र, आता या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाते प्रोत्साहन
सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. तसेच उच्च मूल्यवर्धनासह पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच या फलोत्पादनामध्ये फळे, भाज्या, मसाले, फुले आणि नारळ यांचा समावेश होतो. आणि फळबागांमध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळू शकते. बागायती पिकांसाठी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देखील दिली जाते. फलोत्पादन पिकांना प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
इतके टक्के अनुदान मिळणार
या योजनेअंतर्गत 35 ते 50 टक्के अनुदान हे विविध खर्चाच्या नियमानुसार विविध घटकांसाठी दिले जाते. तसेच यासाठी अर्ज करायचा असल्यास हा अर्ज पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असून हा अर्ज शेतकऱ्यांना करता येणार आहे. हा अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी केली जाते आणि त्यानंतर कर्जास मंजुरी मिळते.
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत बागायती पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक मदत, अनुदान, कर्ज आणि प्रशिक्षण देखील दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात. किंवा अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही नॅशनल हार्टीकल्चर बोर्ड http://nhb.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Maka Rate : ‘या’ बाजार समितीत असे आहेत मक्याचे भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव
- राज्यातील शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट