• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बँकेची नोकरी सोडून भाड्याने घेतले शेत

भाजीपाला पिकवून कोटींची कमाई; तीन मित्रांची प्रेरणादायी यशोगाथा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2023
in यशोगाथा
0
बँकेची नोकरी सोडून भाड्याने घेतले शेत
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

उत्तम नियोजनाने, अभ्यासपूर्वक, परिश्रमाने शेती केली तर आज कोणाताही उद्योग व्यवसायापेक्षा शेती काही कमी नाही. बिहारमधील तीन मित्रांनी हे दाखवून दिले आहे. या तिघांनी बँकेची नोकरी सोडून एक शेतजमीन भाड्याने घेतली. आधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला पिकवून ते आता वर्षाला एक कोटींची कमाई करत आहेत. या तीन मित्रांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

 

देशातील अनेक शेतकरी आज शेतीतून लाखो नव्हे तर करोडो रुपये कमावत आहेत. यासाठी पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने फळे, फुले, भाजीपाल्याची लागवड करत आहेत. यामुळेच आता हळूहळू शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. अनेक सुशिक्षित तरुणही शेतीत रस घेत आहेत. अशाच तीन मित्रांची ही कहाणी, जे भाड्याने जमीन घेऊन भाजीपाला पिकवता आहेत. यातून त्यांची बंपर कमाई होत आहे. आता तर ते इतरांनाही रोजगार पुरवत आहेत. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील हे तिघे रहिवासी आहेत. पाटण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिहटा येथे भाडेतत्त्वावर जमीन घेऊन ते भाजीपाला पिकवत आहेत. विनय राय, राजीव रंजन शर्मा आणि रणजीत मिश्रा अशी या तरुण शेतकर्‍यांची नावे आहेत.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

मित्रांचे हे त्रिकूट भाजीपाला विकून दरवर्षी 50 लाखांचा निव्वळ नफा कमावत आहेत. हे तिघे मित्र मुंबईतील एका बँकेत काम करायचे; पण गावाकडेच शेती करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळेच 9 वर्षांपूर्वी, 2014 मध्ये नोकरी सोडून त्यांनी गावी येऊन शेती करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या शेतात रोज सुमारे 20 ते 25 मजूर काम करतात. या तीन मित्रांनी शेतीचे व्यवसायात रूपांतर केले आहे. त्यांनी नोकरी केली असती तर ते फक्त स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकले असते. आता शेती करून ते इतरांनाही रोजगार देत आहेत. शेतीतील सुरुवातीच्या काही प्रयोगानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी हिरव्या भाज्यांची लागवड सुरू केली. आधी 10 बिघा जमिनीत कोबी, काकडी आणि ब्रोकोलीची लागवड केली. यातून चांगली कमाई झाली. यानंतर त्यांनी हळूहळू क्षेत्र वाढवले. सध्या हे तिघे मित्र 50 बिघा भाड्याच्या जमिनीत हिरव्या भाज्यांची लागवड करत आहेत. हे तिन्ही मित्र वर्षभरात एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा भाजीपाला विकतात.

 

 

बिहार राज्यात कोल्ड स्टोअरेज, पॉली हाऊस, ग्रीन हाऊसचा तुटवडा आहे. तरीही आहे त्या परिस्थितीतून मार्ग शोधत या मित्रांनी मार्केटिंगचे भक्कम तंत्र उभे केले आहे. सरकारने अनुदान देऊन पॉली-ग्रीन हाऊस, कोल्ड स्टोअरेज यांची संख्या वाढवली तर शेतकर्‍यांचे उत्पन्न आणखी वाढेल. ही मंडळी वर्षभरात तीन पिके घेतात. ते 10 एकरात काकडी पिकवतात. याशिवाय, टरबूज-खरबूज यांचीही लागवड करतात. गेल्या वर्षी त्यांनी 25 लाख रुपयांची पपई विकली. याशिवाय कोबी, भोपळा, ब्रोकोली विकूनही लाखो रुपये ते मिळवतात. बिहारमधील स्थानिक बाजारात तसेच कोलकाता-दिल्लीतही ते माल विकतात. आता लवकरच ते परदेशात थेट निर्यात सुरू करणार आहे.

 

Jain Irrigation
Jain Irrigation

 

 

 

विनय कुमार सांगतो, की बिहार राज्यात अजूनही शेतीशी संबंधित अनेक प्रकारच्या सुविधा चांगल्या नाहीत. या सुविधा नसल्याने तिथे भाज्यांचे, कृषीमालाचे खूप नुकसान होते. त्यामुळे शेतकर्‍यांना पडेल किंमतीत माल विकण्यावाचून पर्याय राहत नाही. बिहारमध्ये पुरेसे कोल्ड स्टोअरेज नसल्यामुळे ते आज इंदूरहून गाजर विकत घेतात. तिथल्याच शीतगृहात ठेवतत. जर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोअरेज किंवा साठवणुकीची व्यवस्था असती तर राज्यातील शेतकर्‍यांनी गाजराची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असती. त्यांना माल शीतगृहात ठेवून चांगल्या दराने विक्री करता आला असता. अलीकडे राज्य सरकार शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे; पण त्याचा वेग खूपच कमी आहे. सर्वच सरकारांनी शेतीविषयक आधुनिक सुविधा पुरविण्यावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा या मित्रांनी व्यक्त केली.

 

Planto Advt
Planto

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • 65 वर्षांच्या प्रयोगशील शेतकरी; औषधी वनस्पतींच्या शेतीतून वर्षाला 50 लाखांची कमाई
  • टेरेस गार्डनिंगमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उद्योग व्यवसायभाजीपालारणजीत मिश्राराजीव रंजन शर्माविनय राय
Previous Post

राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता; नोव्हेंबर-डिसेंबरही पावसाचा!

Next Post

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातील सुधा पोल्ट्री फार्मने “लेयर पोल्ट्री”तून उभा केला आदर्श

Next Post
लेयर पोल्ट्री

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातील सुधा पोल्ट्री फार्मने "लेयर पोल्ट्री"तून उभा केला आदर्श

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish