प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना घडतात… त्यातील एखादी घटना अशी असते जी त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून टाकते. केरल राज्यातील कोट्टायम येथील रेमा देवी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या असतांना यांच्या सोबत देखील एक अशीच घटना घडली आणि या घटनेने त्यांचे आयुष्यच बदलले. या घटनेनंतर त्यांनी घरीच टेरेस गार्डनिंगच्या माध्यमातून रसायनमुक्त भाजीपाला, फळे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. या टेरेस गार्डनच्या माध्यमातून त्या रसायनमुक्त भाजीपाला, फळांचे उत्पादन घेत आहेत. शिवाय महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंतची कमाई देखील करीत आहेत.
केरळ राज्यातील कोट्टायम येथील रहिवासी असलेल्या रेमा देवी गेल्या 20 वर्षांपासून टेरेस गार्डनिंगच्या माध्यमातून भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत. या विषयी बोलतांना रेमा देवी सांगतात की, त्यांच्या आजी देखील उत्तम गार्डनर होत्या. या माध्यमातून त्या अनेक प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत. लहान असतांना आम्ही दोघं बहिणी आजीला गार्डनिंगमध्ये मदत करीत होतो. गार्डनिंग करतांना केलेल्या मदतीचे कधी आवडीत रुपांतर झाले समजलेच नाही. त्यामुळेच त्यांनी बॉटनी (वनस्पती शास्त्र) या विषयात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर मात्र त्यांची ही गार्डनिंग करण्याची सवय सुटली.
एका घटनेने बदलले जीवन
रेमा एकदा बाजारातून भाजीपाला खरेदी करीत असतांना एक धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली आणि या घटनेने त्यांना पुन्हा टेरेस गार्डनिंगशी जोडले. या घटनेविषयी बोलतांना त्या सांगतात की, एकदा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेली होते. भाजीपाला घेत असतांना मला त्यातून त्यावर वापरण्यात आलेल्या केमिकलचा वास आला. यामुळे मी थोडी चिंताग्रस्त झाले व माझ्या मनात ममी माझ्या मुलांना असे अन्न खाऊ घालू शकत नाहीफ, असा विचार आला. तेव्हाच मी पून्हा गार्डनिंगच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला, दाळवर्गीय पिके आणि फळझाडे लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.
भाजीपाल्यापासून डाळींपर्यंत सर्व काही…
रेमा या लहान असतांना त्यांच्या आजीला गार्डनिंगमध्ये मदत करीत असायच्या तसेच वनस्पती शास्त्र या विषयात देखील शिक्षण घेतलेले असल्याने गार्डनिंग या विषयात त्या पारंगत झाल्या आहेत. त्याच आधारे आज ते त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्यात डाळींपासून ते भाजीपालापर्यंतच्या सर्व पिकांचा समावेश आहे. सुरुवातीला त्यांनी घराच्या आजू-बाजूच्या जागेत भाजीपाला लागवड केली. जेव्हा स्वत:चे झाले त्यानंतर टेरेसवर गार्डन तयार करुन भाजीपाला लागवडीला सुरुवात केली.
महिन्याला 60 हजारांची कमाई
रेमा यांनी जेव्हा टेरेस गार्डनिंग सुरु केले तेव्हा रसायनमुक्त भाजीपाल्यापासून मुक्तता आणि परिवार लागणार्या भाजीपाल्याची गरज भागविणे हाच एक विचार त्यांच्या डोक्यात होता. परंतु, मागील काही वर्षांपासून त्यांची या टेरेस गार्डनमधील आवड इतकी वाढली आहे की, ते त्यांच्या उत्पन्नाचे देखील साधन झाले आहे. रेमा या गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या गार्डनसाठी लागणारी खते तर बनवितच आहेत. यासोबतच त्यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या भाजीपाल्याचे बी देखील त्या जमा करीत असून त्यांच्या या सिड्स बँकेच्या माध्यमातून त्या चांगली कमाई करीत आहेत. सोशल मीडिया साईट्सच्या माध्यमातून ते हे बियाणे विक्री करतात. या बियाणाच्या एका पाकीटाची किंमत 25 रुपयांपासून तेे 40 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत त्या पिकाची वैशिष्टे आणि उपलब्धतेवर आधारीत असून सध्या या बियाणे विक्रीच्या माध्यमातून महिन्याकाठी 60 हजार रुपये कमवित असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणावर
मागणी वाढली असून राज्य भरातून त्यांना मागणी होत असल्याचेही त्या सांगतात.
यु-ट्युबच्या माध्यमातून जनजागृती
रेमा देवी त्यांनी त्यांचे गार्डनिंगचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेमाज् टेरेस गार्डन नावाने एक यु-ट्युब चॅनेल सुरु केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून त्या शहरात टेरेस गार्डन करु इच्छिणार्यांना मदत करीत आहेत. इतकेच नाही तर त्या बियाणे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. अनेक टिकाऊ पद्धतीने आणि कमी खर्चात टेरेस गार्डनिंग केले जाऊ शकते आणि याच कामात त्यांचे चॅनेल लोकांची मदत करीत असल्याचे ते सांगतात.
काळजी घेणे गरजेचे
टेरेस गार्डन करतांना काही काळजी घेणे गरजेचे असल्याचे रेमा देवी आवर्जून सांगतात. टेरेस गार्डन करतांना घराच्या सर्वात वरची बाजू अर्थात छत लिकेज होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मी सर्व टेरेसला पांढर्या सिमेंटने रंगविले आहे. कुंडी किंवा प्लास्टीक बॅगा थेट छतावर ठेवण्यापेक्षा स्टॅण्ड किंवा नारळाच्या करवंट्यांचा वापर करु
शकतो. एकादा का होईना सेंद्रिय पद्धतीने घरीच भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न सर्वानी करावा, असे आवाहनही त्या करतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- दक्षिण मुंबईतील 107 वर्षे जुन्या पारशी डेअरीचा मेक-ओव्हर, विस्ताराच्या नव्या योजना
- जंबो भाजीपाला पिकविणारा ओमानमधील इंजिनियर शेतकरी