• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दुग्ध व्यवसायात नफा वाढवण्यासाठी असा वाढवा दुधातील फॅट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2024
in पशुसंवर्धन
0
दुग्ध व्यवसाय

मुंबई : दुग्ध व्यवसाय हे आजच्या काळात एक अत्यंत फायदेशीर उद्योग बनले आहे, परंतु या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केवळ दूध उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. दुधातील फॅट्स, प्रोटीन, आणि गुणवत्ता हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात, कारण अधिक फॅट असलेले दूध बाजारात अधिक मूल्यवान असते. दुधातील फॅट्स ही एक प्रमुख मूल्यवर्धन घटक आहे, जी ग्राहकांना आकर्षित करते आणि व्यवसायाला अतिरिक्त नफा मिळवून देऊ शकते. उच्च फॅट दूध उत्पादनाचे फायदे केवळ दुधाच्या बाजारभावामध्येच नाही, तर ग्राहकांची संतुष्टी आणि पुनः खरेदीच्या सादरीकरणातही दिसून येतात.

 

दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाचा स्वाद हा सुद्धा बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी व त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी दुधातील स्निग्धांशास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्याकडे होलस्टीन फ्रिजीयन संकरित गाई असल्यास त्यांच्या पुढील पिढ्या जर्सी जातीच्या रेतमात्रा वापरून तयार कराव्यात. म्हणजे दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढेल. जर्सी संकरित गाईच्या दुधात स्निग्धांशांचे प्रमाण जास्त असल्याने दर दहा गाईत तीन यानुसार संगोपनास गाई ठेवल्यास एकत्रित दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सामान्य प्रमाणात ठेवता येईल. कृत्रिम रेतन पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

 

म्हशींच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण 7 टक्क्यांच्यावर असल्याने अधिक स्निग्धांशासाठी म्हशी पाळाव्यात. जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा, तसेच उसाच्या वाढ्यांचा वापर टाळावा. उसाचे वाढे, भाताचा पेंढा, गव्हाचे काड असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश कमी होते. या चाऱ्याचे पोषणमूल्य मळी, खनिज मिश्रण आणि मीठ वापरून वाढविता येते, त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

 

खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका भरडा, तूर, हरभरा, मूग चुनी, भात- गव्हाचा कोंडा इ. योग्य प्रमाणात द्यावा. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
जनावरांच्या दैनंदिन आहारात २५ ते ३० ग्रॅम क्षार मिश्रणाचा वापर करावा. क्षार चाटण विटा गोठ्यात बांधाव्यात. तसेच, आहारात जीवनसत्त्वांचा देखील वापर करावा.
दूध दोहनातील अंतर समान असावे.
दूध काढताना कास चांगली घुसळून धुवावी, म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणात वाढ होईल. गाईचे दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
गोठा आणि जनावरे स्वच्छ ठेवावीत.
दुधाळ जनावरांना मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईंच्या दूध उत्पादनात व फॅटच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.
जास्त वयस्क गाई, म्हणजेच सातव्या विताच्या पुढे गोठ्यात ठेवू नयेत.

(सौजन्य : ॲग्रोवर्ल्ड प्रकाशन)

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • नोव्हेंबर महिन्यातही आक्टोबर हिटचा प्रभाव ; पेरणी करण्यापूर्वी काय घ्याल काळजी ?
  • प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना ; जाणून घ्या.. फायदे आणि अर्ज प्रक्रिया
Tags: दुग्ध व्यवसायदुधातील फॅटदूध उत्पादन
Previous Post

नोव्हेंबर महिन्यातही आक्टोबर हिटचा प्रभाव ; पेरणी करण्यापूर्वी काय घ्याल काळजी ?

Next Post

गाढव पालनातून तरुण घेतोय लाखोंचे उत्पन्न 

Next Post
गाढव पालनातून तरुण घेतोय लाखोंचे उत्पन्न

गाढव पालनातून तरुण घेतोय लाखोंचे उत्पन्न 

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.