नवी दिल्ली : फॉस्फोरिक ॲसिड आणि फॉस्फेटिक खतांसाठी जागतिक बाजारातील खतांच्या किमती ठरविणार्या मोरोक्कन कंपनी, ओसीपीसह अनेक कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडच्या किमती कमी केल्या आहेत. फॉस्फोरिक ॲसिडसाठी भारतीय कंपन्यांशी 1,715 डॉलर्स प्रति टन या दराने करार केले आहेत. त्याची किंमत आता प्रति टन 1,500 डॉलर्सपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यासह, डी अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या किंमती देखील प्रति टन 860 डॉलर्सच्या जवळपास खाली आल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता खत उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लवकरच देशातील खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
खत अनुदानाबाबत भारत सरकारला दिलासा
मोरोक्कन कंपनी, ओसीपीसह अनेक कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडच्या किमती कमी केल्या आहेत. काही भारतीय कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडसाठी याआधीच 1,715 डॉलर्स प्रति टन या दराने दीर्घकालीन सौदे केले आहेत, परंतु ते 1,500 डॉलर्स प्रति टन पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर, डी अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या किमती देखील प्रति टन 860 डॉलर्सपर्यंत खाली आल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता खत उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. जागतिक बाजारातील या घडामोडी किंमतीच्या आघाडीवर भारतासाठी फायदेशीर ठरतील. खत अनुदानाबाबत भारत सरकारलाही मोठा दिलासा त्यामुळे मिळणार आहे.
फॉस्फेटिक कच्च्या मालाचा 75 टक्के साठा मोरोक्कोकडे
फॉस्फेटिक खतांसाठी जगातील कच्च्या मालाचा 70 ते 75 टक्के साठा मोरोक्कोकडे आहे. सरकारी मालकीचा ओसीपी समूह जागतिक किमतीची दिशा ठरवतो. उर्वरित साठा रशिया, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि चीनमध्ये आहे. ओसीपीने एप्रिल-जून तिमाहीसाठी तात्पुरत्या किमती देखील निश्चित केल्या नाहीत. चढ्या किमतीमुळे भारताला खूप दबाव सहन करावा लागला. उद्योग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसीपीला जुलै-ऑक्टोबर 2022 या तिमाहीतील किमती अजून निश्चित करायच्या आहेत; पण ती कंपन्यांशी थेट व्यवहार करत आहे.
तीन महिन्यांपूर्वी ओसीपी 2,000 डॉलरवर अडून
सौदी अरेबियाची खते कंपनी साबिक (Sabiq) सोबत, काही भारतीय कंपन्यांनी फॉस्फोरिक ऍसिडसाठी 1,715 डॉलर्स प्रति टन या दराने करार केले होते. दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेतील अलीकडची परिस्थिती लक्षात घेता, या किंमती प्रति टन 1,500 डॉलर्सपर्यंत येऊ शकतात. तीन महिन्यांपूर्वी, ओसीपी फॉस्फोरिक ॲसिडच्या किमती 2,000 डॉलर्स प्रति टनपेक्षा कमी करण्यास तयार नव्हते.
भारतीय कंपन्यांनी जूनमध्ये केले वाढीव दराने सौदे
जूनमध्ये, डीएपीची किंमत प्रति टन 1,025 ते 1,040 डॉलर्सच्या आसपास होती. पण सरकारने खत कंपन्यांना 920 प्रति टन पेक्षा जास्त किमतीने डीएपी आयात करण्याचे सौदे न करण्याची अट घातली होती. सरकारने सांगितले होते, की ते आयात करणार्या कंपन्यांना केवळ 920 प्रति टन किंवा त्याहून कमी किमतीच्या आधारावर अनुदान देईल. सूत्रांनी सांगितले की, काही कंपन्यांनी 950 ते 960 डॉलर्स प्रति टन या किमतीत आयात सौदे केले आहेत. आता या किमती 860 प्रति टनपर्यंत खाली आल्या आहेत.
डीएपी निर्यात बाजारात चीनचे पुनरागमन
गेल्या काही महिन्यांत देशात दहा जहाज इतक्या खतांची आवक झाली. यातील सात जहाजे ओसीपीकडून आली आहेत. त्याचबरोबर चीनमधून दोन जहाज डीएपी देखील आयात करण्यात आले आहेत. एका जहाजातून सुमारे 50 हजार टन खतांची आयात केली जाते. सुमारे दीड वर्षांपूर्वी चीनने डीएपीच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे जागतिक बाजारात त्याचे भाव वाढले. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी चीनने बांगलादेशातून निविदेत सहभाग घेऊन डीएपीच्या निर्यात बाजारात पुनरागमन केले आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज
आश्चर्यकारक! Urban Agriculture : ग्रामीण भागातील शेतांपेक्षा शहरांमध्ये चांगली वाढतात पीके, उत्पादनही चार पट जास्त
Comments 2