पुणे : येथील कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदी दिलीप मारुती झेंडे यांची तर निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदी विकास षण्मुख पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य शासनाच्यावतीने कृषी विभागातील गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी (दि.२७) रोजी करण्यात आल्या. तसे परिपत्रक राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलीप झेंडे यांची ऑगस्ट २०२० साली त्यांची कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आधीचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांची निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदी बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर दिलीप झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दिलीप झेंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर विकास पाटील यांची नियुक्ती झाली आहे.