पुणे : गेल्या काही दिवसांपासून कापसाला चांगला दर मिळत होता. मात्र आज कापसाच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कापसाला 7,500 ते 8,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. आता हा दर 7,000 ते 7,300 रुपये प्रतिक्विंटल दरावर आला आहे. आज कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ? हे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज वडवणी आणि भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 7,350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे 1300 क्विंटल कापसाची आवक झाली. सविस्तर बाजारभाव खालीलप्रमाणे…
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (16/3/2024) |
|||
वडवणी | क्विंटल | 17 | 7350 |
आष्टी (वर्धा) | क्विंटल | 794 | 7300 |
वरोरा | क्विंटल | 730 | 7000 |
वरोरा-खांबाडा | क्विंटल | 256 | 7000 |
भिवापूर | क्विंटल | 565 | 7350 |

