पुणे : भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यापासून गेल्या 74 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. ‘कोरोना’ सारख्या काळातही आपल्या अर्थव्यवस्थेचा GDP दर फक्त कृषी क्षेत्रामुळेच टिकून राहिला हे कायम लक्षात ठेवायला हवे. कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या या योगदानामुळेच भारत कृषिप्रधान राष्ट्र म्हणून ओळखला जातो. यामुळे आगामी काळात भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे.
भारताच्या जडणघडणीमध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. यासाठी कॅन बायोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भारतामध्ये 75 ठिकाणी एकाच वेळी शेतकऱ्यांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला तसेच यावेळी शेतकऱ्यांना गौरविण्यात देखील आले. या कार्यक्रमात कंपनी प्रतिनिधी डॉ. वैभव बोंद्रे (Agronomist) यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून विश्वनाथ पाटील व सहकुटुंब परिवार यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार केला व उपस्थित शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचे प्रायोजन समजून सांगितले.
यावेळी गावातील राजेंद्र पाटील भूषण पाटील हे उपस्थित होते. तसेच कंपनीचे विपणन आणि मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष डॉ प्रशांत पवार आणि विक्री विभागाचे उपाध्यक्ष राहुल पारखी तसेच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांच्या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कॅनबायोसिस मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळ शेतकऱ्यांसोबत काम करत असून, कंपनीजैविक खते आणि कीटकनाशकांची एक अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी आहे. संदीपाकानिटकर, (सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ) यांनी मे 2005 मध्ये याकंपनीची स्थापना केली असून कॅनबायोसिस ही कंपनी मृदा आरोग्य, पीक पोषण व पीक संरक्षण व्यवस्थापनासाठी द्रवरूप जैवखते, जैव-कीटकनाशके, बियाणे प्रक्रिया आणि जैवउत्तेजक यांसारख्या प्रमाणित कृषी निविष्ठांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यात तत्पर/कटिबद्ध आणि लोकप्रिय आहे. कॅन बायोसिस नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी ओळखली जाते. कॅन बायोसिसची सर्व उत्पादने Ecocert, FCO आणि CIB नोंदणीकृतआहेत. कॅन बायोसिसच्या संशोधन आणि विकासविभागाला भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने मान्यता दिली आहे.
कॅन बायोसिसला गुणवत्तेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिके मिळाली आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीच्या ‘स्पीड कंपोस्ट’ या प्रॉडक्टला‘ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँडइंडस्ट्रीज (फिक्की)’ तर्फे प्रथम क्रमांकाच्या ‘राष्ट्रीय शाश्वत शेती’ पुरस्काराने गौरविण्यात आले असून, देशात दोनशेहून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात. कंपनीचे 20 हूनअधिक प्रॉडक्ट्स भारतातील विविध राज्यांमध्ये वितरित होतातच परंतु, इतर दहा प्रगत देशांमध्ये सुद्धा कॅनबायोसिस आपले हे गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्यात करते.