Black Rice… पारंपरिक पद्धतीची भातशेती शिवाय नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने काळ्या तांदूळचे (Black Rice) उत्पादन घेण्याचा प्रयोग सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा काळ्या भातशेतीचा (Black rice farming) प्रयत्न केला आहे. जो आता यशस्वी होताना दिसत आहे. आसाममधून बियाणे आणून शेतकऱ्यांनी काळ्या भातशेतीचा प्रयत्न केला आहे.
काळ्या तांदळाच्या (Black rice) बियांची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलो आहे. तालुक्यातील सुपीक वातावरणात तांदूळ फुलत आहे. आणि त्यातून शेतकर्यांना चांगले उत्पादन मिळत असून हा तांदूळ पौष्टिक व खाण्यास आरोग्यदायी आहे. हा भात शिजायला थोडा वेळ लागतो, मात्र तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे या भाताला मागणी आहे. या तांदळाची किंमतही जास्त आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
शेतकऱ्याने आसाममधून बियाणे पेरले
शिराळा तालुक्यात खास करुन भात शेती केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने कृषी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने काही शेतकऱ्यांनी आसाममधून ब्लॅक राईस आणला होता. 200 ते 250 रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागवले होते. पेरणीतून उगवलेल्या रोपातून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपांची लागण केली होती. पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे. या भाताची लांबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.
काळ्या तांदळाला (Black rice) बाजारात चांगला दर मिळतो
या भात पिकाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आल्याचे तालुक्यातील शेतकरी अनिकेत पाटील यांनी सांगितले. यामध्ये युरिया किंवा इतर औषधांसारखी रासायनिक खतांचा वापर करण्यात आलेला नाही. तसेच लागवडीखालील भातशेतीचे क्षेत्र वाढवण्यास ते उपयुक्त ठरेल. त्याचवेळी कृषी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले की, या वाणांची बाजारपेठेतील जास्त मागणी आणि उच्च किंमत लक्षात घेऊन या भाताचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
‘या’ भाताचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन
या भाताचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन आहे आणि बाजारभाव 200 ते 300 रुपये असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. काळ्या भाताच्या लागवडीतून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
कर्करोगावर गुणकारी गुणधर्म
काळ्या तांदळात फायबर, आयर्न व कॉपरसारखे मिनरल्स, वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. याच्या आवरणात सर्वाधिक प्रमाणात अॅँथोसिनीन अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत. त्यामुळे तो कॅन्सरसह विविध आजारांसाठी गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा तांदुळ आरोग्यवर्धक असल्यामुळे चांगला भाव मिळत आहे.
काय आहे ब्लॅक राइस
चीनमध्ये राजघराण्यासाठी पूर्वी काळ्या तांदळाचे राइसचे उत्पादन घेतले जायचे. त्याला फॉरबिडन राइस म्हटले जात. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे या तांदळाचा युरोप, अमेरिकेपर्यंत प्रसार झाला.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇