Home हॅपनिंग शेतमालाला मिळाले डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ ; कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे कृषिमंत्री...

शेतमालाला मिळाले डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ ; कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे कृषिमंत्री मुंडेंच्या हस्ते अनावरण

डिजिटल ई कॉमर्स

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले असून राज्याच्या कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे अनावरण आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झालेली असून त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे. भविष्यात भारतातील ई-कॉमर्स 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाचे असे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा माझा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. सर्वात कमी वयाचा कृषिमंत्री म्हणून पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या ॲपद्वारे केला आहे. या ॲपचा महाराष्ट्रातील शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरवात झाली आहे.

या ॲपद्वारे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय पोस्ट खाते व फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक करणार असल्यामुळे पोस्ट खात्यावरील विश्वास द्विगुणित होईल असेही एवढी कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

Jain Irrigation

बहुपयोगी ॲप

ॲप अनावरणाच्या दिवशीच 358 उत्पादकांची 1370 उत्पादने या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळमार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनंदिन भाव सुद्धा भविष्यात या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असे डाउनलोड करा ॲप

प्ले स्टोअर मध्ये हे ॲप Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड (लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.maidc.mart ) करून फ्लिपकार्ट ॲमेझॉन याप्रमाणेच 1370 उत्पादने खरेदी करता येऊ शकतात. या ॲपवरऑनलाइन पेमेंट सुद्धा करता येऊ शकते.

 

SVPL Solar

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇