हवामान अंदाज

अर्णब चक्रीवादळाचा नेमका मागोवा घेण्यात आयएमडी अपयशी

दुसऱ्या प्रणालीत विलीन होण्याचा थरार स्वतंत्र अभ्यासकांनी पकडला

मुंबई : बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळाचा 28 ऑक्टोबरचा लँडफॉल ही हवामान शास्त्रासाठी एक विलक्षण केस ठरली आहे. स्वतंत्र हवामान प्लॅटफॉर्म विंडी आणि झूम अर्थने जे अचूक टिपले, ते भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या अधिकृत पत्रकातून गायब होते.

अर्णब चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र यांच्यातील आंतरक्रिया.

विश्लेषकांच्या मते या दुसऱ्या प्रणालीने अर्णबला आर्द्रता पुरवली आणि त्याची तीव्रता वाढवली. ECMWF च्या डेटानुसार, 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी या दोन्ही प्रणालींचे विलीन झाले, आणि अर्णबचे लँडफॉल तब्बल 6 तास लांबले. नंतर आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनीच कबूल केले की, चीन-म्यानमारवरील अँटीसायक्लोन, जोरदार पश्चिमेकडील वारे आणि दक्षिण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र या तिहेरी परस्परक्रियमुळे अर्णब जवळपास स्थिर झाला होता. सोप्या भाषेत सांगायचे तर, दोन वादळे एकमेकांना खेचत होती, त्यामुळे अर्णब आंध्र किनाऱ्यावर जास्त वेळ घुटमळला आणि मुसळधार पाऊस पडला, पण IMD ने ही प्रक्रिया वेळेत लोकांना सांगितली नाही.


📞 Call Now

📞 Call Now

घडले असे की, 21 ऑक्टोबरला तामिळनाडू-किनाऱ्यावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र 26 ऑक्टोबरपर्यंत सक्रिय होते. आयएमडीने 26 ऑक्टोबरच्या पत्रकात त्याचा उल्लेख केला, पण 27 ऑक्टोबरच्या पत्रकात तो उल्लेखच काढून टाकला. प्रत्यक्षात झूम अर्थने दाखवले की, ही प्रणाली 28 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजेपर्यंत ओडिशा किनाऱ्याकडे सरकत होती. तर युरोपियन सेंटर ECMWF च्या मॉडेलने विंडीवर दाखवले की, सायंकाळी 6 वाजेपर्यंत ती अर्णबला चिकटून होती आणि अखेर सायंकाळी अर्णबमध्येच विलीन झाली.

कमी दाबाच्या क्षेत्राचा मार्ग.

काही स्वतंत्र अभ्यासकांनी सांगितले की, ही दुसरी प्रणाली अर्णबला सतत आर्द्रता पुरवत होती, त्यामुळे अचानक वादळ तीव्र होण्याचा धोका होता. या बायनरी इंटरॲक्शन मुळेच अर्णबचा वेग ताशी 5 नॉटवर आला आणि त्याचा लँडफॉल 2 ते 8 या 6 तासांपर्यंत लांबला. सामान्य चक्रीवादळ 5 तासात किनारा ओलांडते, पण अर्णब 12 तास यानम-काकिनाडा पट्ट्यावर घुटमळत राहिला.

ईसीएमडब्ल्यूएफ (ECMWF) डेटा, जो बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये अर्णब चक्रीवादळाच्या अवशेषांचे विलीनीकरण दर्शवतो.

उशिरा का होईना, IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 29 ऑक्टोबरला कबूल केले की तिहेरी खेचातानीमुळे हे घडले – एक चीन-म्यानमारवरील अँटीसायक्लोन, दुसरे जोरदार पश्चिमेकडील वारे आणि तिसरे दक्षिण बंगालमधील हेच कमी दाबाचे क्षेत्र. त्यांनीच सांगितले की या टग ऑफ वॉर मुळे वादळ स्थिर झाले, लँडफॉल लांबला आणि नंतर वादळाने उजवीकडे वळण घेतले. स्वतंत्र प्लॅटफॉर्मने आधीच दाखवलेले हे चित्र IMD वेळेत का सांगू शकले नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button