वंडरवर्ल्डवंडरवर्ल्ड

जगातील सर्वात श्रीमंत मांजर; संपत्ती जाणून व्हाल थक्क!

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; ‘इंस्टाग्राम’वर 42 लाखांहून अधिक फॉलोअर्स

जगात एक अशी मांजर आहे, जिच्या मालकाची, मांजरीच्या स्टारडमधून कमावलेली एकूण संपत्ती 839 कोटी रुपये रुपये आहे. या जगातील सर्वात श्रीमंत मांजरीला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे खरे आहे. तिचे नाव नाला कॅट आहे आणि तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर ती एक सेन्सेशन आणि जागतिक ब्रँड बनली आहे. नालाच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, इंस्टाग्रामवर तिला 42 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

बेघर मांजर ते स्टार कॅट

नाला नावाची ही मांजर एका प्राणी निवारागृहात राहत होती. सुरुवातीला कॅलिफोर्नियातील एका प्राणी निवारागृहात तिचे आयुष्य खूप सामान्य होते. 2010 मध्ये, जेव्हा नाला फक्त पाच महिन्यांची होती, तेव्हा वारिसिरी मेटचैत्तिफान यांनी तिला दत्तक घेतले. एके दिवशी नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर बनेल आणि इतकी प्रसिद्ध होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. नवीन घर मिळाल्यानंतर, नाला सोशल मीडियावर स्टार बनली.

सोशल मीडियाने बदलले नशीब 

नालाच्या मालकाने 2012 मध्ये नाला कॅटचे इंस्टाग्राम अकाउंट तयार केले, जिथे त्यांनी तिचे रोजचे क्षण लोकांसोबत शेअर करायला सुरुवात केली. सुरुवातीला, मालकाचा उद्देश फक्त नालाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे हा होता. हळूहळू, लोकांना तिचे फोटो आणि निरागस कृती आवडू लागल्या. तिचा गुबगुबीत चेहरा, निळे डोळे आणि गोंडस शैली लोकांना आवडली आणि तिला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 42 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले. तिची लोकप्रियता इतकी आहे की, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली मांजर म्हणून तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

नाला एवढ्या संपत्तीची मालक कशी बनली?

नालाच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेतून एका मोठ्या व्यावसायिक ब्रँडचा जन्म झाला. काही माध्यमांच्या अंदाजानुसार, नालाची एकूण संपत्ती सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 839 कोटी रुपये आहे. मात्र, हा अधिकृतपणे पडताळलेला आकडा नसून तिच्या नेट वर्थचा अंदाज आहे. नालाच्या कमाईचे प्रमुख स्रोत तिची सोशल मीडिया लोकप्रियता, YouTube आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंट, sponsored जाहिराती, brand collaborations आणि merchandise हे आहेत. याशिवाय Nalaच्या नावाशी संबंधित व्यवसायांमधूनही उत्पन्न मिळते. नालाच्या लोकप्रियतेमुळे या विविध माध्यमांतून मोठी व्यावसायिक कमाई झाली. याच कमाई आणि व्यवसायाशी संबंधित मूल्याच्या आधारे काही माध्यमांनी तिची अंदाजे Net worth 839 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button