• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मान्सून अलर्ट : तळकोकणात अडकलेला पाऊस अलिबागहून मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचला; आज महाराष्ट्रात सर्वदूर दमदार बरसणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2023
in हवामान अंदाज
0
मान्सून अलर्ट : तळकोकणात अडकलेला पाऊस अलिबागहून मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचला; आज महाराष्ट्रात सर्वदूर दमदार बरसणार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या मान्सून अलर्टनुसार (Monsoon Alert), तळकोकणात अडकलेला पाऊस आता 13 दिवसांनंतर अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पाऊस आज महाराष्ट्रात सर्वदूर दमदार बरसणार असल्याचे अनुमान आहे. एकीकडे, अरबी समुद्रातील शाखा सक्रीय होऊन कोकण-मुंबईमार्गे पाऊस राज्यात शिरतोय. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात आधीच सक्रीय झालेल्या शाखेमुळे पाऊस मुंबईआधी विदर्भात जाऊन पोहोचला आहे.

उपग्रह छायाचित्र : पावसाला पोषक ढगांची गर्दी

गेले 13 दिवस रखडलेला आणि तळकोकणात अडकून पडलेल्या मान्सूनने शनिवारी पुन्हा जोर धरला. बंगालच्या उपसागराची शाखा आधीच सक्रीय होती. अरबी समुद्रातील शाखाही आता सक्रिय झाली. त्यामुळे मान्सूनलाही वेग आला आहे. शनिवारी मान्सून कोकणाच्या उत्तरेतील अलिबाग ओलांडून मध्य महाराष्ट्रात शिरला. मराठवाड्यात थेट उदगीर आणि पुण्याहून सोलापूरपर्यंत मान्सूनने मजल गाठली. विदर्भात नागपूर त्याने आधीच गाठले होते. आता अनुकूल हवामान असल्याने मान्सून येत्या दोन दिवसात मुंबई-पुण्यासह बहुतांश महाराष्ट्रात पोहोचेल, असा IMDचा अंदाज आहे.

“आयएमडी”च्या आताच्या अपडेटनुसार, या ग्राफिक्समधून मान्सूनची मध्य महाराष्ट्राकडे होत असलेली आगेकूच पाहता येऊ शकते.

अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी मान्सून मुंबई-पुण्यात पोहोचल्याचेही दिसत आहे. कारण मुंबईत अनेक ठिकाणी काल 200 मिमी पर्यंत पाऊस झाला. पुण्यातही 135 मिमीहून अधिक पाऊस बरसला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेवटच्या आठवड्यातच राज्यभरातील जून महिन्याची सरासरी गाठली जाण्याची शक्यता आहे.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM

मान्सून शुक्रवारी कोकणच्या दक्षिण भागात सक्रीय झाला होता. त्यानंतर काल, शनिवारी अलिबागपर्यंत ही कोकणातील मान्सूनरेषा पुढे सरकली, असे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रीय झाल्याने आता देशात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता “आयएमडी”ने वर्तविली आहे. सध्या तरी, अरबी समुद्रालापेक्षा बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक सक्रीय आसल्याने त्या बाजूने पाऊस पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, उत्तर-पूर्व भारत ओलांडून थेट जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचला आहे. दिल्लीला मात्र अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

मान्सून मुंबई-पुण्यात, आज होऊ शकते अधिकृत घोषणा

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्या अनुमानुसार पुढील दोन दिवसात मान्सूनचे मुंबईत आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. मान्सूनचे निकष पूर्ण झाल्यानंतरच त्याचे मुंबईतील आगमन जाहीर केले जाईल, असे “आयएमडी”ने म्हटले आहे. काल, शनिवारी मुंबईत बरसलेला जबरदस्त पाऊस शहरातील मान्सून आगमन जाहीर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अजून अधिकृतरित्या मान्सून मुंबई-पुण्यात पोहोचल्याची घोषणा झालेली नाही. कारण, मान्सून आल्याचे जाहीर करण्याचे काही निकष असतात. त्यानुसार, गेल्या 24 तासात झालेल्या पावसाच्या नोंदींचा आधार घ्यावा लागतो. ठराविक काळ, ठराविक पाऊस झाल्यानंतरच “आयएमडी” कडून त्या भागात मान्सून आल्याची अधिकृत घोषणा केली जाते. साधारणतः मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा दमदार पावसानंतर दुसऱ्या दिवशी केली जाते. त्यामुळे, मुंबई-पुण्यात मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा आज, रविवारी जाहीर केली जाऊ शकते, असा काही हवामानतज्ञांचा दावा आहे. यापूर्वी केलेली घाई आणि त्यावर होणारी चौफेर टीका लक्षात घेऊन हवामान खात्याने अधिकृत घोषणेबाबात सबुरीचा मार्ग धरलेला दिसतोय.

सध्या तरी मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणपर्यंत सर्वत्र मान्सूनची लक्षणे दिसत आहेत. उत्तर आणि दक्षिण कोकणमध्ये येत्या पाचही दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषत: कोकणाच्या उत्तर भागात पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

वायव्य राजस्थान ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत पूर्व-पश्चिम क्षेत्र आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील क्षेत्रात प्रचंड आर्द्रता निर्माण झालेली दिसत आहे. त्यामुळे आज पूर्व राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात तीव्र मान्सूनचे ढग दिसत आहेत. या परिसरात अती मुसळधार पावासाची शक्यता आहे.

रविवारी बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रवास आता येत्या काही दिवसात मध्य भारताकडे होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रभावाने पुढील चार दिवसात विदर्भात सर्वत्र पाऊस बरसणार आहे. तर, 26 ते 27 जून या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याचे अनुमान आहे. किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींचीही शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

 

मुंबईत ऑरेंज अलर्ट, रायगड-रत्नागिरीलाही इशारा

मान्सूनने नव्याने जोर धरल्यानंतर काल पहिल्याच दिवशी मुंबईत दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी 200 मिमीचा टप्पा गाठला गेला. रविवारी मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यात येत्या चार आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील बहुतांश भागासह मध्य महाराष्ट्रातील घाट भागात शनिवारी सकाळपासून संततधार पावसाची हजेरी होती. काही ठिकाणी तर मध्यम ते जोरदार पाऊस नोंदवला गेला. कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट भागालगतच्या क्षेत्रातही काल दिवसभर चांगला पाऊस झाला. पालघर, औरंगाबाद आणि वाशीम जिल्ह्यातही काल पावसाने दमदार हजेरी लावली. पुण्यात 135 मिमीहून अधिक पाऊस नोंदविला गेला. पिंपरी-चिंचवड परिसरातही चांगला पाऊस झाला. आता पावसाचा जोर वाढल्यास जूनमधील उरलेल्या काही दिवसातच महिन्याची सरासरी ओलांडली जाऊ शकते.

मान्सूनची प्रगती, पावसासाठी पोषक स्थिती – आयएमडी

बंगालच्या उपसागरात वायव्येकडील वातावरणात सध्या चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून आज, रविवारपर्यंत या हंगामातील पहिले मान्सून मॉडेल कार्यान्वित होण्याचे म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रातही पश्चिम किनारपट्टीशी समांतर क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात गुजरातजवळ चक्रीय स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. या स्थितीच्या प्रभावाने मान्सूनच्या वाऱ्यांना जोर आला आहे. मान्सूनची प्रगती, पावसासाठी ही पोषक स्थिती असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • पाऊस : राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात
  • Sukanya Samriddhi Yojana : कमी गुंतवणूकीत मिळेल तिप्पट परतावा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अलिबागआयएमडीतळकोकणमान्सून
Previous Post

पाऊस : राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात

Next Post

मान्सून 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून वर सरकला – IMD चे हवामान तज्ञ होसाळीकर यांनी दिली Good News

Next Post
मान्सून 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून वर सरकला – IMD चे हवामान तज्ञ होसाळीकर यांनी दिली Good News

मान्सून 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून वर सरकला - IMD चे हवामान तज्ञ होसाळीकर यांनी दिली Good News

ताज्या बातम्या

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

बाजीकाका पासलकर

इतिहास के अनदेखे योद्धा – 1 : ⚔️ बाजीकाका पासलकर – मराठा स्वराज्य के पहले कमांडर-इन-चीफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2026
0

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने "हापूस"ला वाचवले!

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने “हापूस”ला वाचवले!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा

अरे देवा! हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा; भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानवर दुर्मीळ हवामान प्रणाली सक्रिय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish