हॅपनिंग

‘पोकरा’ योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा – बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला (प्रतिनिधी) – स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असून त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी विविध स्तरावर असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पोकरा योजनांचा आढावा घेणासाठी येथे घेतलेल्या बैठकीत कृषी विभागाला दिले.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बच्चू कडू यांनी शुक्रवारी (ता. 4) पोकरा योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपसंचालक अरुण वाघमारे, कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी यावेळी उपस्थित होते.

व्यक्तीगत लाभाच्या योजना, सामूहिक लाभाच्या योजना व शेती गट व कंपनी यांच्या लाभाच्या योजना या प्रकारचे वर्गीकरण करावे. त्याप्रमाणे नियोजन करुन शेतकऱ्यामध्ये पोकरा योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी पॉम्पलेट छापावे. योजनाची अंमलबजावणी परिपूर्ण करावी. कोणीही कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश, यावेळी संबंधिताना दिले. पोकरा योजनेअंतर्गंत निवड झालेल्या प्रत्येक गावांनी सार्वजनिक कामे सूचवावे व त्यांचा प्रस्ताव एकत्रीत सादर करावे, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिले.

Related Articles

Back to top button