भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजतीलच एक योजना असलेल्या पीएम-किसान योजनेतील बेकायदेशीर लाभार्थींना आता पैसे परत करावे लागणार आहेत. अपात्र असाल तर तुम्ही ऑनलाइनही हे पैसे त्वरित परत करू शकता.
अशा पद्धतीने परत करता येतील अवैध लाभाचे पैसे
या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्यांना सरकारकडून सातत्याने पैसे परत करण्याचा इशारा देण्यात येत आहे. तुम्हीही या श्रेणीत येत असाल तर लवकर पावले उचला, अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
2. तळाशी तुम्हाला ऑनलाइन रिफंड बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करा
3. यामध्ये दोन पर्याय दिसतील.
जर तुम्ही पीएम-किसानचे पैसे परत केले असतील, तर प्रथम तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
4. अन्यथा, दुसरा पर्याय तपासा आणि सबमिट करा.
5. यानंतर आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
6. इमेज टेक्स्ट टाइप करा आणि गेट डेटा वर क्लिक करा.
7. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही कोणत्याही परताव्याच्या रकमेसाठी पात्र नाही, हा संदेश येईल अन्यथा परताव्याची रक्कम दर्शविली जाईल
या शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही, ते या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच, कोणाकडे शेतजमीन असेल, परंतु त्यावर अकृषिक कामे होत असतील, तर त्यांनाही लाभ मिळणार नाही. लागवडीयोग्य जमिनीवर शेती होत नसली तरी तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेऊन भाड्याने शेती केली तरी त्या भाड्याने शेती करणाऱ्या व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही. सर्व संस्थात्मक जमीनधारक या योजनेच्या कक्षेत येणार नाहीत. जर कोणी शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही घटनात्मक पदावर असेल तर त्या शेतकरी कुटुंबाला लाभ मिळणार नाही. या सर्वांशिवाय, तुमच्या कुटुंबात एखादा करदाता असला तरी, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.