मुंबई : Winter Update… वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम देशभर पहावयास मिळत असून त्याचा परिणाम ऋतू चक्रावरही झाल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा ज्या प्रमाणे पावसाने उशिरा हजेरी लावली त्याच प्रमाणे थंडीचेही आगमन उशिराने होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
भारतीय हवामान विभाग (आय.एम.डी)चे महानिर्देशक मृत्युंजय महापात्र यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी, देशात ऋतुचक्रामध्ये मोठे बदल पहावयास मिळत आहेत. ज्या प्रमाणे उत्तर भारतातून पाऊस उशिराने परतला, त्याच प्रमाणे थंडीचेही आगमन उशिराने होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे थंडीची प्रतीक्षा लागून असलेल्यांना वाट पहावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यात देशभरातील बहुतांश भागात रात्रीचे तापमान सामान्य पेक्षा जास्त राहील, असा अंदाजही श्री. महापात्र यांनी वर्तविला असून थंडीच्या लाटेची शक्यता फेटाळून लावली आहे.
जम्मू काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये दिवसाचे तापमान सामान्य पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण राहू शकते, असे असले तरी, किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, नोव्हेंबर महिन्यादरम्यान थंडीच्या लाटेसाठी आवश्यक वातावरण तयार होण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇