पुणे : कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते याच पांढऱ्या सोन्याला बाजार समित्यांमध्ये 10 हजार रुपये क्विंटल अधिक भाव मिळाला. मात्र, यंदा कापसाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण झाल्याचे दिसून येत आहे. पण 2024 या नवीन वर्षात कापसाचे भाव वाढतील का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव..
यावर्षी पर्जन्यमानात झालेली घट आणि यामुळे कापसाची उशिरा लागवड झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पाण्यात भिजला. त्यामुळे भिजलेल्या कापसाला 5 हजार 500 ते 6 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. दरम्यान, उत्पादनात झालेली घट आणि अवकाळी पावसामुळे कापसाचे झालेले नुकसान पाहता कापूस बाजार समित्यांमध्ये पाहिजे तेवढी तेजी दिसत नाही.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची 4 हजार क्विंटल आवक झाली असून येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 7 हजार 020 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच काल दि. 26 रोजी पुलगाव कृषी बाजार समितीत 7 हजार 225 रुपये दर मिळाला.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल | परिणाम | आवक | सर्वसाधारण दर |
कापूस (27/12/2023) | |||
राळेगाव | क्विंटल | 4000 | 6900 |
कापूस (26/12/2023) | |||
संगमनेर | क्विंटल | 150 | 6150 |
सावनेर | क्विंटल | 3500 | 6750 |
भद्रावती | क्विंटल | 635 | 7007 |
पारशिवनी | क्विंटल | 946 | 6740 |
अकोला | क्विंटल | 108 | 6425 |
उमरेड | क्विंटल | 248 | 6750 |
मनवत | क्विंटल | 6700 | 7075 |
देउळगाव राजा | क्विंटल | 1900 | 6900 |
वरोरा | क्विंटल | 4224 | 6800 |
वरोरा-खांबाडा | क्विंटल | 2263 | 6850 |
काटोल | क्विंटल | 200 | 6700 |
हिंगणा | क्विंटल | 42 | 6650 |
सिंदी(सेलू) | क्विंटल | 1600 | 6920 |
पुलगाव | क्विंटल | 5225 | 6975 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कांद्याला असा मिळतोय भाव ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
- ज्यूट पोत्याच्या सक्तीमुळे साखर उद्योग नाराज; शेवटी ग्राहकाची साखर महागणार!