पूर्वजा कुमावत
जपानमधील अकिरा मियावाकी यांनी 1980 च्या शतकात मियावाकी पद्धत विकसित केली. ही पद्धत जापान देशात सुरू झाली. मियावाकी म्हणजे काय तर स्थानिक वनस्पतींनी घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी मियावाकी तंत्राचा वापर केला आहे. एखाद्याच्या अंगणात जंगल वाढवून शहरी वनीकरणासाठी ही अनोखी पद्धत जगभरात वापरली जाते. मियावाकी पद्धतीने अनेक देशांमध्ये स्थानिक, देशी वृक्षारोपणाची निवड करून अनेक यशस्वीरित्या जंगले निर्माण केली जात आहेत. अकिरा मियावाकी यांनी कमी जागेत व कमी वेळेत उत्तम जंगल निर्माण करण्याची ही पद्धत सुरू केली आहे. मियावाकी यांनी जंगलाच्या परिस्थितीचा अभ्यास केला व त्यांना या अभ्यासातून लक्षात आले की देशातील 64% क्षेत्रावरील देशी वृक्षाचे जंगल काही कारणांमुळे नष्ट झाली आहेत.
मियावाकी पद्धतीने सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत 250 मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या 40 पेक्षा जास्त देशी पण दुर्मिळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते. वृक्ष लागवडीत त्याचे कुळ, जाती, प्रजाती यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांचे देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. मियावाकी जंगल हे आपण घरांच्या मागे, मंदिर परिसरात, विद्यालयात किंवा रस्त्याच्या दुतर्फासुद्धा करता येते. मियावाकी ही एक नैसर्गिक प्रयोगशाळाच आहे. ज्यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होते.
वैशिष्ट्ये
या पद्धतीत स्थानिक वनस्पतींचा वापर केला जातो. रोपे एकमेकांना वाढवण्यासाठी आधार देतात. सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचण्यापासून रोखला जातो, जेणेकरून तण वाढीस प्रतिबंध होते. रोपांना पहिल्या तीन वर्षातनंतर पाहणी करण्याची गरज नसते. उंच पातळीच्या जैविविधतेसह स्वयं-शाश्वत असे जंगल निर्माण होते. समान परिसरात शक्य तितक्या जवळ झाडे लावावे लागतात. मियावाकी पद्धत 2 ते 3 वर्षाच्या आत स्वावलंबी वनस्पती तयार करण्यास मदत करते, तर पारंपारिक प्रक्रियेस स्मारक 100 वर्ष लागतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇